
रेवती हिंगवे, पुणे
Pune Crime News : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने 10 एकर जमीन आपल्या नावावर व्हावी म्हणून जमीन मालकीनीकडून कोट्यवधी रुपये उकळले. तसेच खोटी जमीन मालकीण उभी करून तिच्या नावाचे खोटे कागदपत्र पण तयार केले. पुण्यातील वाघोली परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
पुण्यातील वाघोली परिसरात 10 एकर जमीन आहे, ज्याच्या मूळ मालक अपर्णा वर्मा या आहेत. त्या गेल्या अनेक वर्षांपासून दुबईमध्ये राहत होत्या. जमिनीचा रेडीरेकनरनुसार आता या जमिनीचा भाव 100 कोटी इतका आहे. याच्याच आमिषाने तत्कालीन चंदननगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी जमीन हडपण्याचे प्रयत्न केले. इतकंच नाही तर त्यांनी अपर्णा वर्माच्या जागी अर्चना पटेकर हिला उभी केले आणि हीच अपर्णा वर्मा असल्याचं दाखवलं. तसेच खोटी कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : Yavatmal News: मुख्याध्यापिका आणि शिक्षकाचं लव्ह मॅरेज, वर्षभरातच खेळ संपला! विद्यार्थ्यांच्या मदतीनं नवऱ्याची हत्या )
या प्रकरणात पुणे-मुंबईला कोर्टात ये-जा करायला नको म्हणून तब्बल 7 कोटी रुपये अपर्णा वर्मा याच्याकडून उकळले. अजून एक धक्कादायक बाब म्हणजे याच जमिनीवरून मालकीहक्कचा वाद सुरू असताना सर्व जमिनीचे कागदपत्रे लांडगे यांच्याकडे होते आणि या प्रकरणातल्या आरोपीला म्हणजेच आनंद भगत यांच्या नावाने फिर्याद दाखल करून वरिष्ठांची बनावट सही देखील केली.
(नक्की वाचा- Pune News: 'हे बाळ माझं नाही तर दुसऱ्याचे', वैष्णवी बरोबर त्या घरात भयंकर घडलं, FIR मध्ये धक्कादायक बाबी)
आनंद भगत यांना 50 लाख रुपये, अर्चना पाटेकरच्या नावाने 50 लाख रुपये, लांडगे यांच्या मेहुण्याला दीड कोटी तर लांडगे यांना 4 कोटी 50 लाख रुपये अपर्णा वर्मा यांनी दिले. त्यातच अजून 11 कोटींची मागणीही करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहे तर राजेंद्र लांडगे यांचा देखील शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world