जाहिरात

Pune Municipal Corporation Election Result: निवडणूक जिंकताच गुन्हा दाखल, सूरज लोखंडेंनी काय केलं ?

सूरज लोखंडे हे प्रभाग क्रमांक 28 मधून निवडून आले आहेत. जनता वसाहतचा हा परिसर असून त्यांनी भाजपच्या विनया प्रसाद बाहुलीकर यांचा पराभव केला आहे.

Pune Municipal Corporation Election Result: निवडणूक जिंकताच गुन्हा दाखल, सूरज लोखंडेंनी काय केलं ?
FIR Filed Against NCP's Suraj Lokhande - सूरज लोखंडे हे 228 मतांनी विजयी झाले.
Suraj Lokhande FB
पुणे:

पुणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल  (Pune Municipal Corporation Election Result 2026 ) 16 जानेवारी रोजी लागला. 15 जानेवारी रोजी पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठीची निवडणूक पार पडली होती. पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून लढली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 27 नगरसेवक जिंकून आले आहेत.

पुण्यात भाजपने जिंकल्या 119 जागा

पुण्यामध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष झाला असून त्यांना एकहाती सत्ता मिळवण्यात यश आलं आहे. पुण्यामध्ये भाजपचे 119 नगरसेवक जिंकले आहेत. पुण्यामध्ये एकूण 165 जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज लोखंडे यांनी अटीतटीच्या लढाईत विजय मिळवला. लोखंडे यांनी अतिआनंद झाल्याने विजयाचा जल्लोष केला. हा जल्लोष लोखंडे यांच्या अंगलट आला आहे. 

पर्वती पोलीस ठाण्यात सूरज लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल

सूरज लोखंडे हे प्रभाग क्रमांक 28 मधून निवडून आले आहेत. जनता वसाहतचा हा परिसर असून त्यांनी भाजपच्या विनया प्रसाद बाहुलीकर यांचा पराभव केला आहे. सूरज लोखंडे हे अवघ्या 228 मतांनी विजयी झाले असून ते विजयी झाल्याचे घोषित झाल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पुण्यामध्ये पोलिसांनी मतमोजणीनंतर विजयी मिरवणुका काढण्यास मनाई केली होती. मिरवणुकीला बंदी घातलेली असतानाही सूरज लोखंडे आणि त्यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली होती, ज्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज लोखंडे यांनी मिरवणुकीसाठी परवानगी मागितली होती मात्र त्यांना ती नाकारण्यात आली होती. असं असतानाही मिरवणूक काढणे सूरज लोखंडे यांना महागात पडले आहे. जनता वसाहतीतील जय भवानीनगर इथे सूरज लोखंडे आणि समर्थकांनी मिरवणूक काढल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com