- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी
Pune Wife Murder: पुण्यातील येवलेवाडी परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात तब्बल 5 किलोचा वजनाचा गॅस सिलिंडर घालून तिची हत्या केली. ही घटना बांधकाम मजुरांच्या कॅम्पमध्ये (लेबर कॅम्प) घडली असून हत्येनंतर आरोपी पतीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली आहे.
कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल | Domestic Dispute Escalates to Murder
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पती आणि मृत महिला येवलेवाडी परिसरातील एका बांधकाम प्रकल्पाच्या लेबर कॅम्पमध्ये वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणादरम्यान पतीचा राग अनावर झाला आणि त्याने घरात असलेला पाच किलोचा वजनाचा गॅस सिलिंडर उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा :Viral Video: संतापजनक! महिलांच्या डब्यात शिरुन दादागिरी, महिलेला ढकललं अन्...मुंबई लोकलमधील धक्कादायक घटना)
हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर | Accused Surrenders at Police Station
आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने पळून न जाता थेट जवळचे पोलीस ठाणे गाठले, केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली. आरोपीने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे पोलीसही सुरुवातीला चक्रावून गेले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
(नक्की वाचा : Extortion News: आधी डान्सर म्हणून भेटल्या, नंतर रचले भयंकर जाळं; प्रसिद्ध मराठी गायकाला धमकावत मागितले लाखो रुपये)
घटनास्थळी पोलिसांची धाव; तपास सुरू | Police Launch Investigation at the Crime Sceneघटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोस्टमार्टेमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हत्येसाठी वापरलेला सिलिंडर जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, या घटनेमुळे लेबर कॅम्पमधील कामगारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world