Pune Election News: पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युती मोडल्याची घोषणा झाली आहे. पुण्याचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी "युती तुटल्यात जमा आहे," असे स्पष्ट संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
युती तुटण्यादरम्यानच्या प्रमुख घडामोडी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आधीच जाहीर केलं होतं की, आगामी निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसे आणि भाजप युती करून लढणार आहेत. तर या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नसेल.
- पहिली कोर कमिटीची बैठक पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये पार पडली. मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर आणि भाजपचे काही आमदार उपस्थित होते. तर शिवसेना शिंदे गटाकडून निलम गोऱ्हे आणि आमदार विजय शिवतारे हे उपस्थित होते.
- मात्र सातत्याने बैठका झाल्यानंतर जागा वाटपाच्या दरम्यान भाजपने 140 जागांवर दावा केला. 7 जागा RPI आठवले गट आणि उर्वरीत शिंदेंच्या शिवसेनेसाठी असा फॉर्मुला ठरला होता.
- मिळालेल्या माहितीनुसार, आधी शिंदे सेनेला 10 ते 12 जागाच देण्यात आले आणि नंतर नाराजी नाट्य झाल्यावर ते 15 करण्यात आले.
- मात्र नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने करून "आम्हाला युती नको" अशी भूमिका मांडली होती.
- शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांना देखील एकच तिकीट देण्यात आले. शहरप्रमुख नाना भानगिरे यांनाही सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने आणि प्रभागांच्या अदलाबदलीत डावलल्याने हा पेच निर्माण झाला.
- आज पुन्हा रामी ग्रँड हॉटेलमधील बैठकीतून नाना भानगिरे आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर उठून निघून गेल्याने वादावर शिक्कामोर्तब झाले.
- युती तुटण्याचं मुख्य कारण सन्मानपूर्वक जागा न मिळाल्याने आणि ज्या प्रभागात शिंदे सेना निवडून येऊ शकत नाही, अशा ठिकाणी भाजप त्यांना जागा देत होते.
(नक्की वाचा- Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?)
शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने आता जास्त वेळ न घालवता आपल्या उमेदवारांना AB फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील रामी ग्रँड हॉटेल हे सध्या या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले असून, तिथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. शिवसेना आता पुण्यातील सर्व 165 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे.
उदय सामंत पुण्याच्या वाटेवर
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तातडीने पुण्याकडे रवाना झाले आहेत. ते कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका मांडतील, असं सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world