Pune News : शिंदे गट-अजित पवार गट एकमेकांशी भिडले, पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत राडा

Pune News : धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Political News : महायुती सरकारमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील धुसफूस सातत्याने समोर येत आहे. निधी वाटपाच्या मुद्यावरूनही शिवसेना शिंदे गट अजित पवारांवर विविध आरोप करत आहेत. आता पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत शिवसेना शिंदे गट आणि  अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. शिंदे गट-अजित पवार गट एकमेकांना भिडल्याचा प्रकार समोर आला आहे.  

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख उद्धव कांबळे यांच्यात वाद झाला. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार वादावादी पाहायला मिळाली. 

Advertisement

(नक्की वाचा- Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना पुन्हा मिळणार मोठी जबाबदारी! 30 जून रोजी होणार शिक्कामोर्तब)

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली. नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत राजकीय कुरघोडी आणि दोन सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यात वाद झाल्याने हा चर्चेचा विषय बनल्याचे पाहायला मिळाले. 

बैठकीदरम्यान स्थानिक पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकामासंदर्भात चर्चा सुरू असताना पद्मावती परिसरातील एका सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित केला. सोसायटीच्या बाजूला झोपडपट्टी असून अवैध धंदे चालतात ते बंद करण्यात यावेत. यामध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप केला असता सुभाष जगताप यांनी बोलण्यास मज्जाव केला. 

(नक्की वाचा-  Crime News : भूत उतरवण्याचा नावाखाली अडीच वर्षाच्या मुलाला चटके देत वेताच्या छडीने मारहाण, मुंबईतील धक्कादायक प्रकार)

कांबळे यांना काही काळानंतर बोलण्याची संधी मिळाली तेव्हा ही जागा जगताप यांचीच होती, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केल्यावर हा वाद उफाळला आणि शाब्दिक चकमक उडाली. यामध्ये आता वरिष्ठ काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world