Railway Accident : ऑफिसला पोहोचण्याची घाई जीवावर बेतली, धावती लोकल पकडताना प्रवाशाचा तोल गेला अन्...

अंबरनाथवरून सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी सीएसएमटीसाठी फास्ट लोकल रवाना होते. ही लोकल अंबरनाथच्या यार्डातून प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत असताना एक प्रवासी चालत्या लोकलमध्ये चढायला गेला.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, अंबरनाथ

Ambarnath Railway Accident : लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी चालती लोकल पकडणं अंबरनाथच्या एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि लोकलच्यामध्ये हा प्रवासी अडकला. यात हा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबरनाथवरून सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी सीएसएमटीसाठी फास्ट लोकल रवाना होते. ही लोकल अंबरनाथच्या यार्डातून प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत असताना एक प्रवासी चालत्या लोकलमध्ये चढायला गेला. मात्र लोकल वेगात असल्याने त्याला लोकलमध्ये चढता आलं नाही आणि तो घसरून थेट प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये जाऊन पडला आणि त्याच्यावरून 2 ते 3 डबे पुढे गेले. 

(नक्की वाचा- एस्केलेटरवरून पडून वृद्धाचा मृत्यू, पुणे रेल्वे स्थानकातील घटना)

या अपघातात हा प्रवासी गंभीर जखमी झाला असून आरपीएफने त्याला बाहेर काढत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र जागा पकडण्यासाठी प्रवासी करत असलेली घाई कशी जीवावर बेतू शकते, हे या निमित्ताने पुढे आलं आहे.

बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार

मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान लवकरच 'पुढील स्टेशन - कासगाव' अशी उद्घोषणा ऐकू येणार आहे. कारण कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजूरी देत रेल्वेकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे बदलापूरकरांना नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत पोहोचणं शक्य होणार आहे.

Advertisement
Topics mentioned in this article