जाहिरात

Raj Thackeray in Mira Road: मुजोर दुकानदाराला फटकावणारे मनसैनिक करणार राज ठाकरेंचे स्वागत

Raj Thackeray In Mira Road On July 18: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 18 जुलै रोजी मीरा रोडच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Raj Thackeray in Mira Road: मुजोर दुकानदाराला फटकावणारे मनसैनिक करणार राज ठाकरेंचे स्वागत
मुंबई:

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलै रोजी मीरा रोडचा दौरा करणार आहे.त्यांचा हा दौरा गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे महत्वाचा मानला जात आहे. राज्यामध्ये मराठी-हिंदी भाषेवरून सध्या वातावरण तापलेलं आहे. मराठीत बोलणार नाही असे म्हणज मुजोरी करणाऱ्या एका दुकानदाराना मनसैनिकांनी फटकावलं होतं. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेपूर्वी घडलेल्या या प्रकारामुळे मराठी भाषेसाठीच्या लढ्याला अधिकच धार आली होती.  राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातही या घटनेचा उल्लेख करत मनसैनिकांना विशेष सूचना केल्या होत्या. 

( नक्की वाचा: मनसेच्या दणक्यानंतर मुजोर मारवाडी दुकानदार रातोरात गायब, दुकानही बंद )

शुक्रवारी राज ठाकरेंच्या दौऱ्यात काय होणार?

18 जुलै रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा रोडच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे हे मनसेच्या नव्या शाखेचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ते मीरा भाईंदरमधील मनसेच्या सगळ्यात पहिल्या शाखेलाही भेट देणार आहेत. नव्या शाखेच्या उद्घाटनानंतर या शाखेबाहेरून ते मनसैनिकांसमोर भाषण करण्याची शक्यता आहे. हे छोटेखानी भाषण असेल असे सांगितले जात आहे.

राज ठाकरे संध्याकाळी येणार असले तरी अमित ठाकरे त्यांच्याआधीच मीरा रोडला पोहोचतील असे कळते आहे. राज ठाकरे मीरा रोडमध्ये आल्यानंतर ज्या मनसैनिकांनी जोधपूर स्वीट अँड स्नॅक्स दुकानाचे मालक बाबूलाल चौधरी यांना चोपलं होतं ते मनसैनिक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. 

( नक्की वाचा:भाजपचे वाचाळवीर खासदार निशिकांत दुबेंना मनसेची नोटीस, 7 दिवसात उत्तर देण्याचा इशारा )

मराठी माणसाच्या मोर्चादरम्यान घडल्या नाट्यमय घडामोडी

मीरा रोडमध्ये 8 जुलै रोजी निषेध पदयात्रा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चापूर्वी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे मनसेचे नेते अधिक आक्रमक झाले होते, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा निघणारच अशी भूमिका घेतली होती. हा मोर्चा निघण्यापूर्वी मीरा भाईंदरमधल्या व्यापाऱ्यांनी मारहाणीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला होता. त्याला परवानगी मिळते मात्र महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाने काढलेल्या मोर्चाला परवानगी मिळत नाही,हा अजब प्रकार असल्याची संतप्त भावना मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केली होती.मनसेच्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि या मोर्चासाठी त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचीही साथ मिळाली होती. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com