जाहिरात

Sandip Raut FB Post : संजय राऊतांच्या बंधूंच्या फेसबुक पोस्टने खळबळ, काही तासातच दिलं स्पष्टीकरण

Sandip Raut Facebook Post : माझे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने ही पोस्ट दिसत होती, असं संदीप राऊत यांनी म्हटलं. संदीप राऊत हे शिवसेना प्रणित  भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी ही आहेत.

Sandip Raut FB Post : संजय राऊतांच्या बंधूंच्या फेसबुक पोस्टने खळबळ, काही तासातच दिलं स्पष्टीकरण

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे सख्खे बंधू संदीप राऊत यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. संदीप राऊत यांची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र काही तासाच संदीप राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. माझे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने ही पोस्ट दिसत होती, असं संदीप राऊत यांनी म्हटलं. संदीप राऊत हे शिवसेना प्रणित  भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी ही आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संदीर राऊत यांची फेसबुक पोस्ट

संदीप राऊत यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "अलीकडे पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पारंपरिक शिवसैनिकांपेक्षा नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या नव उताविळांनाच डोक्यावर घेतलं जातं आहे."  

(नक्की वाचा-  "2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन", भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकी)

संदीप राऊत यांच्या फेसबुक अकाऊंटवरील ही पोस्ट व्हायरल झाल्याने विरोधकांनी देखील संजय राऊतांवर निशाणा साधला. शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत म्हटलं की, संदीप राऊत काहीही चुकीचं बोलले नाहीत. ती (ठाकरे गट) फक्त लेना बँक आहे. संजय राऊत यांच्या घरातील व्यक्ती बोलते यावरून आपण काय ते समजून जावं. स्वतःच्या भावाला जे आपल्या ताब्यात ठेवू शकत नाहीत, त्यावर मी काय बोलणार. याचं उत्तर संजय राऊत यांच्याकडून अपेक्षित आहे, असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं. 

Latest and Breaking News on NDTV

(नक्की वाचा - INDIA मधील राहुल गांधींची जागा धोक्यात, ममतांच्या खांद्यावरुन लालूंची फायरिंग )

संदीप राऊत यांचा खुलासा

संदीप राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "माझे फेस बुक अकाउंट हॅक झाले होते. त्यामुळे ती पोस्ट माझ्या अकाउंटवर दिसली. आता अकाऊंट रिकव्हर केले असून त्या पोस्टचा माझा काहीही संबंध नसून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांचा एकनिष्ठ शिवसैनिक असून कोणीही त्याचा विपर्यास करू नये. जय महाराष्ट्र"

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: