
योगेश लाटकर, नांदेड
सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारू दुकाने बंद करा, असं आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंधराशे रुपयांची महिलांना गरज का पडते , मालक धडधाकट कमवते , पण येताना पावशेरी मारतो, आकडे खेळतो. त्याच्यातच चालली कमाई सगळी.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाडक्या बहिणीची जर एवढी काळजी असेल तर मुख्यमंत्री एकनाश शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बहिणीच्या कल्याणासाठी दारूचे धंदे बंद करावे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. दारूचे धंदे बंद झाले तर माय मावल्या 1500 रुपये मागणार नाहीत. महिला सुखी होतील, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
( नक्की वाचा - 'तुम्हाला अपात्र का करु नये?', अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा सवाल)
अजित पवारांनी सख्या बहिणींची काळजी घेतली नाही
लाडकी बहीण योजना अजित पवारांनी जाहीर केली. ज्या माणसाने एक महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला. त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
एवढी बहिणींची काळजी असेल तर बहिणीला 1500 नको, दाजीला नोकरी द्या. दाजीच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
( नक्की वाचा : फडणवीस-देशमुख वादात नवा ट्विस्ट; निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाचा मोठा गौप्यस्फोट! )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world