ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरून खासदार संजय राऊत यांनी मनसे आणि राज ठाकरेंवर नाव न घेता सडकून टीका केली आहे. हल्ला करणारे दिल्लीच्या अहमदशहा अब्दालीचे लोक होते. दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिल्या आहेत. त्यातली ही एक सुपारी होती, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडमध्ये मनसे प्रमुखांसोबत जे घडलं, त्याच शिवसेना पक्ष म्हणून आमचा काहीही संबंध नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र कालची घटना अॅक्शनला रिअॅक्शन असे कोण म्हणत असेल, काळोखाचा फायदा घेऊन तु्म्ही जे काही फेकलं. मात्र अंधाराचा फायदा घेतल्याने तुम्ही वाचलात. तुम्ही मर्दांची औलाद असता तर समोर येऊन केलं असतं. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की असं काही करु नका. तुमच्या घरात तुमचे आई-वडील वाट पाहतात, तुमची पत्नी मुलं वाट पाहतात, असा इशारा देखील हल्लेखोरांना संजय राऊत यांनी दिला.
(नक्की वाचा- उद्धव ठाकरेंच्या सभेआधी मनसेचा राडा, ठाकरेंवर बांगड्या फेकल्या, दगडही फेकले)
महाराष्ट्रात जे घडतंय त्याची मजा दिल्लीत अहमदशाह अब्दाली घेत आहे. महाराष्ट्र आपआपसाठी लोकांना लढवण्यासाठी अहमदशाह अब्दालीन काही प्रमुख नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे. या सुपाऱ्या कशा वाजतात, हे तुम्ही काल पाहिलं, अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.
मी कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही कारण हे सगळं दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीच्या इशाऱ्यावरुन चाललं आहे. याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्पना आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक)
ठाण्यात नेमकं काय झालं?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज ठाण्यात मेळावा होता. त्या मेळाव्याला ते येणार होते. ते ज्यावेळी मेळाव्यासाठी गडकरी रंगायतन इथे पोहोचले, त्याच वेळी मनसैनिकांनी एकच गोंधळ केला. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणाचे गोळे फेकण्यात आले. त्यानंतर बांगड्याही फेकण्यात आल्या. काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना त्यावेळी रोखले. यावेळी गडकरी रंगायतन बाहेर जोरदार गोंधळ झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड ही केली.