शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत शिवसेनेने 45 उमेदवारांची घोषणा केली होती.
आज जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत मिलिंद देवरा यांना आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे यांना उमेदवारी शिवसेनेने दिली आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या संजय निरुपम यांना देखील शिवेसेने दिंडोरी येथून उमेदवारी जाहीर केली आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघातून विधानपरिषदेच्या आमदार भावना गवळी यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघावर भाजपही दावा करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी उद्या भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केलं होतं. त्यामुळे आता ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
(नक्की वाचा- NDTV Exclusive : मनसेने महायुतीसोबत न जाण्याचा निर्णय का घेतला? संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण)
शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे
- अक्कलकुआ - आमश्या पाडवी
- बाळापूर- बळीराम शिरसकर
- रिसोड- भावना गवळी
- हदगाव - संभाराव कदम कोहळीकर
- नांदेड दक्षिण - आनंद शंकर तिडके पाटील (बोंडारकर)
- परभणी- आनंद शेशराव भरोसे
- पालघर - राजेंद्र गावित
- बोईसर- विलास सुकुर तरे
- भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे
- भिवंडी पूर्व - संतोष शेट्टी
- कल्याण पश्चिम- विश्वनाथ भोईर
- अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर
- विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे
- दिंडोशी - संजय निरुपम
- अंधेरी पूर्व - मूरजी पटेल
- चेंबूर - तुकाराम काते
- वरळी - मिलिंद देवरा
- पुरंदर - विजय शिवतारे
- कुडाळ - निलेश नारायण राणे
- कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर