जाहिरात

NDTV Exclusive : मनसेने महायुतीसोबत न जाण्याचा निर्णय का घेतला? संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण

NDTV Conclave : जेवढे सहज नेते पक्ष बदलतात तेवढे सहज कपडेही बदलता येत नाहीत. पुढची पीढी हे सगळं बघत असेल आणि राजकारण असंच असतं असा त्यांचा समज झाला तर ही आपली चूक ठरेल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

NDTV Exclusive : मनसेने महायुतीसोबत न जाण्याचा निर्णय का घेतला? संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र मनसेचे काही महिन्यातच असा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मनसे नेते संदीप देशपांडे या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

NDTV मराठीच्या 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या विशेष कार्यक्रमात बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती. विधानसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार होते, म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचवेळी शिवतीर्थावरुन त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेशही कार्यकर्त्यांना दिले होते. 

महायुतीचं जागावाटप सुरु होतं त्यावेळी भाजप 160-170, शिवसेना 100-120 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 80-90 जागा लढवणार असा दावा करत होते. त्यामुळे या जागा 288 पैकी 400 पर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे आम्ही त्यांच्याच घुसून यांना अधिक त्रास देण्यात काही अर्थ नव्हता. आम्ही सोबत गेलो असतो तर या जागा 450 पर्यंत गेल्या असत्या, त्यामुळे अजून अवघड झालं असतं, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.  

(नक्की वाचा-  'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र)

वेगळा पर्याय लोकांना मिळायला हवा

महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा वेगळा पर्याय महाराष्ट्राला मिळायला हवा. ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राने पाहिलं, त्यात कधी कोण कुठे जाईल हे काहीच कळत नाही. असं राजकारण मी तरी पाहिलं नव्हतं. जेवढे सहज नेते पक्ष बदलतात तेवढे सहज कपडेही बदलता येत नाहीत. पुढची पीढी हे सगळं बघत असेल आणि राजकारण असंच असतं असा त्यांचा समज झाला तर ही आपली चूक ठरेल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

(नक्की वाचा- युगेंद्र पवारांसमोर उमेदवार देणे टाळता आलं असतं का? रुपाली चाकणकरांनी म्हटलं...)

निवडणुकीनंतर महायुती सोबत जाणार का?

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीसोबत जाणार का? याबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, सध्या जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या भल्यासाठी जो निर्णय घ्यायचा याचा निर्णय राज ठाकरे घेतली. मात्र आम्ही सत्तेत असू, असा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com