महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. वारंवर रटाळ चर्चा सुरु असून निर्णय काहीच नाही. ठाकरे गटाने यावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांविषयी थेट दिल्लीत तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल रात्री उशीरा महाविकास आघाडी नेते जागावाटप चर्चा झाली, पण अंतिम निर्णय घेतलाच नाही. यावरून ठाकरे गटाचे नेते नाराज आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या नाराजी नाट्यावर शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीतील पेच सोडवण्यासाठी शरद पवारांची वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती देखील मिळत आहे. दिल्लीत काँग्रेस नेते चेन्नीथला आणि मल्लिकार्जून खरगे यांच्याशी शरद पवारांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे.
(नक्की वाचा - जरांगेंनी पत्ते खोलले, हिशोब होणार! 'तू देत नाही तर तुला पाडल्या शिवाय सोडत नाही')
ठाकरे गट-शरद पवार गट वेगळी बैठक घेणार?
राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची एकत्रित बैठक होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीतही जागा वाटपाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसच्या अडमुठेपणाच्या भूमिकेवरून दोन्ही पक्ष नाराज असल्याची माहिती आहे. रात्री राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळत आहे.
(नक्की वाचा- लढणार की पाडणार? जरांगेंचं ठरलं? मोठ्या निर्णयाच्या तयारीत मराठा समाज)
संजय राऊत काय म्हणाले?
आज निर्णायक भूमिका घेतली जाऊ शकते. आम्ही अजिबात नाराज नाही, नाराजी कळवण्याचा देखील प्रश्न येत नाही. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला आमचे निर्णय घेता येतात. आम्ही कुणाला का नाराजी कळवायची. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो, चर्चांना उपस्थित राहतो. भाजपच्या बगलबच्चांचा पराभव करायचा आहे. महाविकास आघाडीची तब्येत चांगली आहे, त्याविषयी आक्षेप घेण्याचं कारण नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.