जाहिरात

Pune News: पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग! शहराजवळील 'या' 11 ठिकाणी धो धो बरसला, रस्त्यांवरही साचलं पाणी, VIDEO

पुणे शहरात सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.

Pune News: पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग! शहराजवळील 'या' 11 ठिकाणी धो धो बरसला, रस्त्यांवरही साचलं पाणी, VIDEO
Pune Rain Video Viral
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Maharashtra Rain Update Today : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, हवामान विभागाने (IMD) आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 48 ते 72 तास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागने व्यक्त केली आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह विजांसह वादळी पाऊस कोसळू शकतो, असे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे ज्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. तेथील नागरिकांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुण्यात कुठे-कुठे पडला मुसळधार पाऊस?

पुणे शहरात सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.शहरातील शिवाजीनगर,स्वारगेट,डेक्कन,कोथरूड,पर्वती, सहकारनगर,कात्रज,येरवडा,कल्याणीनगर,औंध तसेच सिंहगड रस्ता परिसरात जोरदार पाऊस झाला.विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह वादळ होण्याची शक्यता आहे.मराठवाड्याला देखील 'यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

नक्की वाचा >> Siya Goyal News : केतन अग्रवालच्या हत्येसाठी सिया गोयलने काय काय केलं? संपूर्ण Google हिस्ट्री आली समोर

उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार?

सिंधुदुर्गात मान्सूनच्या आगमनानंतर दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केले असले तरी दोन दिवस पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसाचे पाठ फिरवली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात ऊन पडत आहे. मात्र शेतकऱ्यांनी लावणी योग्य आलेल्या भाताच्या रोपांची लागवड करायला सुरुवात केली आहे. कारण भाताच्या रोपांची 21 दिवसानंतर लावणी केली जाते, हा कालावधी वाढला तर उत्पादनात घट होते. म्हणून भाताच्या रोपांची लागवड सुरू केली आहे. भात लावणीला हवा तसा पाऊस झाला नसला तरी नदीचे पाणी उपसा करून भाताची रोप लागवड केली जात आहे. तर उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यात रविवारपासून (28 जून) पावसाचे पुनरागमन शक्य आहे. तूर्तास जरी पावसाची पुणे शहरात विश्रांती असली तरी रविवारी पावसाचा जोर वाढू शकतो. शहरात दोन दिवस समाधानकारक पाऊस बरसल्यानंतर पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं, पण पाऊस पडला नाही. दोन दिवसांच्या तुलनेत तापमानातही वाढ नोंदवण्यात आले आहे. असे असले तरी, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात मात्र आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com