प्रतीक्षा पारखी, पुणे
Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात झाला आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट झाडाला जाऊन धडकली. या अपघातात बसमधील 20 ते 22 जण प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील सहजपूर फाट्याजवळ रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर थांबलेल्या ट्रकपासून वाचण्याचा प्रयत्न चालकाने केला आणि बस झाडाला धडकली. सुदैवाने अपघातात कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- आमदाराच्या पुतण्याचा प्रताप, दोघांना चिरडले,अपघातानंतर आमदार म्हणतात...)
धडक इतकी जोरदार होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. चालकाच्या बाजूचा भाग झाडामध्ये शिरल्याचं दिसत आहे. घटनेनंतर काही वेळातच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले. तर अपघातानंतर या मार्गावर काही प्रमाणात वाहूतक कोंडी देखील पाहायला मिळाली. बघ्यांची मोठी गर्दी देखील घटनास्थळी जमली होती.
(नक्की वाचा - झोमॅटो बॉयला फरफटत नेले, 8 बाइक्सना उडवलं; त्या दोघांची मस्ती जीवावर बेतली)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूरहून मुंबईला बस जात असताना दौंड तालुक्यातील यवतजवळील सहजपूर गावात ही घटना घडली. अचानक एक ट्रक वाटेत थांबला आणि टक्कर टाळण्यासाठी बसचालकाने बस वळवली पण बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. जखमी प्रवाशांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.