जाहिरात

Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला राज्य सरकारची मंजुरी

Dharavi Redevelopment Project : नर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात या जमिनीवर किंवा 2 एकर जमिनीवर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणि धारावी रहिवाशांसाठी आधुनिक गृहसंकुल बांधणार आहे. 

Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला राज्य सरकारची मंजुरी
Dharavi Redevelopment Phase 1: महाराष्ट्र सरकार ने धरावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट के पहले चरण को दी मंजूरी

अदाणी समूहाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला महिनाभरात सुरुवात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत सर्वप्रथम रेल्वेच्या 27 एकर जागेचा विकास करून बांधकाम सुरू केले जाणार आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील कंपनी नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (NMDPL) ज्याचे नाव आधी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (DRPP) होते, ती पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात या जमिनीवर किंवा 2 एकर जमिनीवर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणि धारावी रहिवाशांसाठी आधुनिक गृहसंकुल बांधणार आहे. 

(नक्की वाचा- : "विरोध करणारे बहुतेक लोक बाहेरचे", धारावीतील स्वयंसेवी संस्थांचा पुनर्विकास सर्वेक्षणाला पाठिंबा)

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील नागरिकांना मोफत घर मिळणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत इथल्या रहिवाशांना 350 चौ. फूट आधुनिक घरं दिली जातील. ज्यात स्वयंपाकघर आणि शौचालय असेल. या प्रकल्पाअंतर्गत चांगले रस्ते असतील याशिवाय या प्रकल्पाअंतर्गत रुग्णालये, शाळा, मोकळ्या जागा इत्यादी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. 

(नक्की वाचा- Dharavi Social Mission : वर्षभरात धारावीकरांसाठी कौशल्य विकासाच्या 10 हजार आणि रोजगाराच्या 3 हजार संधी)

अपात्र मानल्या गेलेल्या नागरिकांना देखील घर मिळणार आहे. या अपात्र रहिवाशांना दोन उपवर्गात विभागले गेले आहे. 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या कालावधीत रहिवाशांना परवडणाऱ्या किमतीत मालकीची घरं दिली जातील. 2011 नंतरच्या घरधारकांना राज्य सरकारच्या परवडणाऱ्या भाड्याच्या घरांच्या धोरणानुसार घरे दिली जातील. ज्यात भाड्याने घर घेऊन नंतर ते विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. 

 

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: