Nashik News: नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार; महानगरप्रमुखांसह 8 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यालाही खास एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन हजेरी लावली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik News : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. नाशिकचे महानगरप्रमुख विलास शिंदे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

(नक्की वाचा- Hindi Controversy: राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये, गुणरत्न सदावर्तेंची मागणी)

विलास शिंदे यांच्यासह 8 माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. गुरुवारी समर्थकांसोबत मिसळ पार्टीचे आयोजन करत विलास शिंदेंनी प्रवेश निश्चित केला आहे. विलास शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. 

विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यालाही खास एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन हजेरी लावली होती. दरम्यान जिल्हाप्रमुखपदी मला डावलल्याने माझी नाराजी असून गेल्या 30 वर्षांपासून मी निष्ठावंत आहे, इतर कोणत्याही पक्षात मी कधीही गेलो नाही. 

(नक्की वाचा- Hindi Controversy: राज- उद्धव ठाकरेंचा मुंबईत 5 जुलैला एकत्र मोर्चा, हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधु एकटवले!)

आठ नगरसेवकही मी माझ्या प्रभागात निवडून आणले होते. मात्र तरी देखील मला विश्वासात घेतले जात नसल्याची टीका विलास शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांच्यावर केली. तसेच एकनाथ शिंदे दिलदार माणूस असल्याचंही विलास शिंदेयींनी म्हटले.

Advertisement