जाहिरात

Thane Metro: ट्रायल झाली पण ठाणे मेट्रो सुरु कधी होणार? MMRDA कडून तारखा जाहीर

प्रकल्पाचा एकूण खर्च 15,498 कोटी आहे. तर अंदाजे 2031 पर्यंत दररोज 13.43 लाख प्रवासी या मेट्रोचा वापर करतील असा अंदाज आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन प्रमुख टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.

Thane Metro: ट्रायल झाली पण ठाणे मेट्रो सुरु कधी होणार? MMRDA कडून तारखा जाहीर

Thane Metro News : ठाणे शहराची भविष्यातील लाईफलाईन असलेल्या मेट्रो मार्गिकेची आज चाचणी घेण्यात आली आहे. घोडबंदर मार्गावरील चार मेट्रो स्थानकांची तांत्रिक तपासणी आणि ट्रायल रन सोमवारी पार पडली. या चाचणीमुळे ठाणेकर नागरिक आणि प्रवाशांमध्ये हा प्रकल्प कधी सुरू होणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) आता या प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्याच्या कालावधीबद्दल माहिती दिली आहे.

वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली-गायमुख या ‘मेट्रो मार्गिका-4 आणि 4-अ' प्रकल्पाची एकूण लांबी 35.20 किमी आहे. या संपूर्ण उन्नत मार्गावर एकूण 32 स्थानके असतील. प्रकल्पाचा एकूण खर्च 15,498 कोटी आहे. तर अंदाजे 2031 पर्यंत दररोज 13.43 लाख प्रवासी या मेट्रोचा वापर करतील असा अंदाज आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन प्रमुख टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.

(नक्की वाचा- MAHA Metro Recruitment 2025: मेट्रोत वरिष्ठ पदावर नोकरीची संधी! पगार 40 हजार ते 2.80 लाख, चेक करा डिटेल्स)

  • टप्पा-1 : या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंतची 10.5 किमीची मार्गिका सुरू होईल. यामध्ये एकूण 10 स्थानके असतील. यापैकी 4 स्थानके डिसेंबर 2025 पर्यंत, तर उर्वरित 6 स्थानके एप्रिल 2026 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
  • टप्पा-2 : कॅडबरी जंक्शन ते गांधी नगरपर्यंतचा 11 किमीचा टप्पा ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात 11 स्थानके असतील.
  • टप्पा-3 : गांधी नगर ते वडाळापर्यंतची 12 किमीची अंतिम टप्पा ऑक्टोबर 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Thane Metro Trial : ठाणेकर सुखावले! वाहतूक कोंडीतून सुटका, आज ट्रायल रन; कोणत्या स्थानकांवर थांबा, जाणून घ्या)

या चारही मेट्रो मार्गिका पूर्ण झाल्यावर सुमारे 58 किमीचा भारतातील सर्वात मोठा उन्नत मार्ग उपलब्ध होईल. यामुळे दररोज 21.62 लाख प्रवाशांना फायदा होण्याची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणाऱ्या या मेट्रोमुळे प्रवासाच्या वेळेत 50% ते 75% पर्यंत बचत होईल. यामुळे प्रवाशांना पर्यावरणास अनुकूल, सुरक्षित आणि आधुनिक प्रवास प्रणाली उपलब्ध होईल. तसेच, वाहतूक कोंडी कमी होऊन शहराचे जीवनमान सुधारेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com