जाहिरात

Thane News: खडवलीला फिरायला जात असाल तर सावधान! भातसा नदी पात्रात उतरल्यास गुन्हा दाखल होणार

Thane News: कल्याण तालुक्यातील खडवलीजवळील भातसा नदीपात्रात पर्यटनाच्या नावाखाली होणारी हुल्लडबाजी आणि वाढत्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

Thane News: खडवलीला फिरायला जात असाल तर सावधान! भातसा नदी पात्रात उतरल्यास गुन्हा दाखल होणार

मुंबई आणि ठाणे परिसरातील पर्यटकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या कल्याण तालुक्यातील खडवलीजवळील भातसा नदीपात्रात आता पर्यटकांना उतरता येणार नाही.  पर्यटनाच्या नावाखाली होणारी हुल्लडबाजी, मद्यपान आणि नदीत बुडून होणाऱ्या दुर्घटना गंभीर दखल घेत बेहेरे-खडवली ग्रुप ग्रामपंचायत आणि मांडा-टिटवाळा पोलिसांनी संयुक्तपणे या परिसरात कडक निर्बंध लागू केले आहेत. नदीपात्रात आंघोळीसाठी उतरणाऱ्या पर्यटकांवर आता थेट कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

40 ते 45 गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

कल्याण तालुक्यातील खडवली गावाजवळून वाहणारी भातसा नदी ही बारमाही असून तिचे पाणी अत्यंत स्वच्छ व शुद्ध मानले जाते. याच नदीचे पाणी परिसरातील सुमारे 40 ते 45 गावांमधील हजारो नागरिकांना शासकीय नळयोजनेद्वारे पिण्यासाठी पुरवले जाते.

(नक्की वाचा-  Pune: दुर्घटना नव्हे हत्या! होणाऱ्या पत्नीनेच केतनला लोहगडावरून दरीत ढकललं, पोलिसांना संशय, कारण काय?)

दूषित पाण्याचा धोका

मात्र, येथे येणारे पर्यटक नदीच्या पाण्यात उतरून आंघोळ करणे, कपडे व वाहने धुणे तसेच कचरा टाकून पाणी दूषित करत असल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याशी होणारी ही खेळ थांबवण्यासाठी नदीपात्रात उतरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Pune News: पाणीटंचाईमुळे पाण्याचे दुर्भिक्ष! त्यात नवी अडचण, पुणेकरांचं टेन्शन वाढलं)

वाहतूककोंडीला बसणार लगाम

सुट्टीच्या दिवशी या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांची प्रचंड झुंबड उडते. मात्र, काही हुल्लडबाजांमुळे या क्षेत्राला छावणीचे स्वरूप येते. नदीकाठी आणि पात्रात मोठ्या प्रमाणावर मद्यपान, धूम्रपान आणि इतर अनुचित प्रकार घडतात. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक तरुणांना येथे आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला कशीही वाहने उभी केल्यामुळे मोठी वाहतूककोंडी होते. काही वेळा पर्यटकांच्या गटांमध्ये हिंसक हाणामाऱ्याही झाल्या आहेत. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी आता पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com