Thane Water Cut News: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि काळजी घेण्याची बातमी आहे. ठाण्यातील अनेक प्रमुख भागांमध्ये येत्या आठवड्यात सलग 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. जागतिक हवामान बदल, 'अलनिनो' (El Nino) आणि 'आयओडी'च्या (IOD) प्रभावामुळे यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, भविष्यात शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ही पाणी कपात केली जात आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा हा पुरवठा निश्चित वेळेसाठी थांबवला जाणार आहे.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
पाणी कपातीची वेळ आणि तारीख
पाणी पुरवठा गुरूवार, दिनांक 4 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून बंद केला जाणार आहे. तर शुक्रवार, 5 जून दुपारी 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशा रितीने एकूण सलग 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कुठे-कुठे पाणीपुरवठा बंद राहणार आहे?
दिवा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व परिसर, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31 चा काही भाग वगळता मुंब्र्यातील सर्व भाग, वागळे प्रभाग समिती रुपादेवी पाडा, किसननगर नंबर 2 आणि नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती कोलशेत खालचा गाव या परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
पुढील 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पूर्वकल्पना दिली आहे की, शुक्रवार, 5 जून रोजी दुपारी 12 वाजता शटडाऊन संपल्यानंतर जेव्हा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, तेव्हा पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. पाईपलाईनमध्ये हवा भरल्यामुळे आणि पाण्याचा साठा पूर्वपदावर येण्यास वेळ लागत असल्याने पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तसेच पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन देखील महापालिकेने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world