CM एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत 5 वर्षात तब्बल 26.11 कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती?

एकनाथ शिंदे यांची संपत्ती 2019 साली 11 कोटी 56 लाख 72 हजार 466 रुपये होती. जी 2024 मध्ये वाढून 37 कोटी 68 लाख 58 हजार  150 रुपये झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी एकनाथ शिंदे यांनी संपत्तीची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात तब्बल 26 कोटी 11 लाख 85 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

एकनाथ शिंदे यांची संपत्ती 2019 साली 11 कोटी 56 लाख 72 हजार 466 रुपये होती. जी 2024 मध्ये वाढून 37 कोटी 68 लाख 58 हजार  150 रुपये झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 1 कोटी  44 लाख 57 हजारांची जंगम मालमत्ता आहे. तर पत्नीकडे 7 कोटी 77 लाख 20 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 कोटी 38 लाख 50 हजार रुपयांची तर पत्नीकडे 15 कोटी 08 लाख 30 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशी एकूण 28 कोटी 46 लाखांची ही मालमत्ता आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर 5 कोटी 29 लाख 23 हजार रुपयांचं कर्ज आहे. तर पत्नीच्या नावे 9 कोटी 99 लाख 65 हजार रुपयांचं कर्ज आहे. 

(नक्की वाचा - बारामतीत काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत; दोन्ही पवार आज भरणार उमेदवारी अर्ज  )

सोनं किती?

एकनाश शिंदे यांच्याकडे 110 ग्रॅम सोन्याची दागिने आहेत. ज्याची किंमत 7 लाख 92 हजार रुपये इतकी आहे. तर पत्नीकडे 580 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. ज्याची किंमत 41 लाख 76 हजार इतकी आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  "माझी ही शेवटची निवडणूक, एकदा मला निवडून द्या"; गोपीचंद पडळकरांची भावनिक मतदारांना साद)

वाहने किती? 

एकनाथ शिंदे यांच्या नावे एका आरमाडा (किंमत 96 हजार रुपये) आणि एक बोलेरो (किंमत 1 लाख 89 हजार रुपये) अशी दोन वाहने आहेत. तर पत्नीच्या नावे टेम्पो,दोन इनेव्हा, स्कॉर्पियो कार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर एकूण 18 गुन्हे दाखल आहेत.  मात्र यातील एकही गुन्हा गंभीर स्वरुपाचा नाही.