Traffic congestion on LBS Road will be reduced : लोकलला पर्यायी सेवा उपलब्ध असताना अद्याप मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या आ वासून उभी आहे. प्रवाशांचे कित्येक तास वाहतूक कोंडीमुळे वाया जातात. रस्त्यांवरील खड्डे आणि त्याशिवाय वाहतूक कोंडी अशा दुहेरी संकटाचा सामना दररोज मुंबईकरांना करावा लागतो.
LBS म्हणजेच लालबहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक कोंडी ही रोजचीच झाली आहे. अखेर मुंबईकरांचा हा प्रश्न लवकरच सुटणार आहे. पूर्व उपनगरातली भीषण वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता मुंबईत नवा फ्लायओव्हर बनवण्यात येणार आहे. कुर्ला ते घाटकोपरदरम्यान हा 4 किलोमीटरपेक्षा लांबीचा नवा उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे.
काय आहे नवा प्रकल्प..
कुर्ला-घाटकोपर (Kurla to Ghatkopar) नवा फ्लायओव्हर बनण्यात येणार असून यामुळे पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल असा अंदाज आहे. कुर्लाच्या कल्पना टॉकीजपासून पुलाची सुरुवात करण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Kalyan News : कल्याणच्या मलंग रस्त्यावरुन जायला घाबरतायेत प्रवासी, रात्रीच्या 'त्या' घटनेने परिसरात खळबळ
खर्च किती?
या नव्या उड्डाणपुलासाठी तब्बल 1 हजार 635 कोटींचा खर्च येणार आहे. उड्डाणपुलाची सुरुवात कुर्लाच्या कल्पना टॉकीजपासून होणार आहे. तर शेवट हा घाटकोपरच्या पंखे शाह दर्गाह परिसरात होणार आहे. या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसंच एलबीएस मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.
कुर्ला-घाटकोपर नवा फ्लायओव्हर
4 लेनची सुविधा
3.92 किमी - मुख्य रस्त्याची लांबी
4 वर्ष - कामकाजाची मुदत
खर्च - 1,635 कोटी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
