जाहिरात

Pune News: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, कधी अन् कुठे? वाचा संपूर्ण 'रोडमॅप'

विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 राेजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 राेजी रात्री 12 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहेत.

Pune News:  पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, कधी अन् कुठे? वाचा संपूर्ण 'रोडमॅप'
Pune Perne Vijaystambh Salutation Traffic Issue
पुणे:

Perne Vijaystambh Road Map Latest News : विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 राेजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 राेजी रात्री 12 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे. चाकण ते शिक्रापूर-शिक्रापूर ते चाकण या दोन्ही बाजुकडील वाहतुकीस सर्व प्रकारच्या खाजगी चालकांना प्रवेश बंदी असणार आहे. या मार्गावर अनुयायांच्या बसला प्रवेश देण्यात येणार आहे. अनुयायांच्या कार, जीपसारख्या हलक्या वाहनांना प्रवेश करता येणार नाही. तसच चाकण आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक, पांजरपोळ चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी जड अवजड, मल्टी अॅक्सल वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. 

मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणारी सर्व प्रकारची (जड वाहने,माल वाहतूकीचे टेम्पो,ट्रक)वाहने वडगाव मावळ-एचपी चौक म्हाळुंगे-वासोली फाटा किंवा वाघजाई नगर मार्गे-बिरदवडी गाव-रोहकल फाटा-पुणे नाशिक रोड-खेड-मंचर नारायणगाव-आळेफाटा मार्गे अहिल्यानगर येथे जातील. खाजगी हलकी वाहने वडगाव मावळ येथून तळेगाव चाकण रोडने चाकण चौक-खेड-पाबळ-शिरुर मार्गे अहिल्यानगर येथे जातील.आळंदी,कोयाळी आदीमार्गे रसिका हॉटेल चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना शिक्रापूर दिशेने जाण्यास बंदी करण्यात येणार असून ही खाजगी वाहने चाकण मार्गे त्यांच्या डेस्टिनेशनवर जाऊ शकतात. 

कोणत्या महामार्गांवर असेल प्रवेश बंदी?

मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने सेंट्रल चौक देहूरोडमार्गे निगडी-पिंपरी चिंचवड बाजुकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना मनाई करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक सेंट्रल चौकातून मुंबई-बंगळुरु महामार्गाने थेट वाकड नाका चांदणी चौकमार्गे जाऊ शकतात.मुंबईहून एक्सप्रेस महामार्गाने पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या जड अवजड वाहनांना उर्से टोलनाका येथुन मुंबई-बंगळरु महामार्गाने मुकाई चौक सेंट्रल चौक मार्गे निगडी-पिंपरी चिंचवडकडे जाण्यास प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहने वाकड नाका व राधा चौक येथुन पुणेच्या दिशेनं जाऊ शकतील.

नक्की वाचा >> Pune News: पत्नी आंघोळीला गेली होती, पतीने केलं भयंकर कृत्य! पुणे पोलीस जेजुरीला जाताच गेम पलटला

चाकण, म्हाळुंगे, मरकळ,तळेगाव इ. एमआयडीसीमधील जड अवजड वाहनांच्या अनुयायांच्या मार्गावर येण्यास मनाई करण्यात येत आहे.आळंदी मरकळ लोणीकंदकडे जाणाऱ्या व येणाऱ्या खासगी हलक्या आणि जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.या मार्गावरील वाहने अलंकापुरम चौक (तापकीर चौक)डावीकडे वळून गोडावून चौक मार्ग,चऱ्होलीफाटा देहुफाटा डावीकडे वळून नाशिक हायवेवरुन,चऱ्होली फाटा देहुफाटा चाकण चौक माजगाव एमआयडीसी चाकण मार्गे तसेच मरकळ एमआयडीसी,सोळु,धानोरेकडून येणारी हलकी व जड अवजड वाहने मरकळ गाव येथून डावीकडे वळून कोयाळी मार्गे रसिका हॉटेल चौकातून चाकण येथून मार्गस्थ होतील.

विजयस्तंभ पेरणेफाटा येथे कार्यक्रमासाठी जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनांकरीता वाहतुकीत बदल

नाशिककडून येणाऱ्या अनुयायांच्या बसेस चाकण मार्गे शिक्रापुर वाहनतळ तसेच मुंबईकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने  येणाऱ्या अनुयायांच्या बसेस वडगाव फाटा-म्हाळुंगे-चाकण मार्गे शिक्रापूर वाहनतळाकडे जातील. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने येणारी अनुयायांची हलकी वाहने वडगाव फाटा-म्हाळुंगे-चाकण चौक-डावीकडे वळून- आळंदी फाटा,भारतमाता चौक, मोशी चौक-आळंदी-मरकळ-तुळापूरमार्गे लोणीकंद वाहनतळाकडे जातील. मुंबईकडून एक्सप्रेस महामार्गाने येणारी अनुयायांची हलकी वाहने उर्से टोलनाका येथून डावीकडे वळून वडगाव फाटा- म्हाळुंगे- चाकण चौक -आळंदी फाटा,भारतमाता चौक,मोशी चौकमार्गे आळंदी मरकळ तुळापुर मार्गे लोणीकंद वाहनतळ तसेच  मुंबईकडून एक्सप्रेस हायवेने येणारी अनुयायांची हलकी वाहने मुकाई चौक मार्गे-सेंट्रल चौक -नाशिक फाटा मार्गे वाहनतळ ठिकाणी जातील.

नक्की वाचा >> Navi Mumbai: उद्यापासून सुरु होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोणत्या शहरांसाठी सुरु होणार विमानसेवा?

नाशिककडून नाशिक-पुणे महामार्गाने येणारी अनुयायांची कार,जीपसारखी हलकी वाहने चाकण चौकातून डावीकडे न वळता सरळ पुढे जाऊन आळंदी फाटा किंवा भारत माता चौक किंवा मोशी चौक,पांजरपोळ चौक या ठिकाणावरुन डावीकडे वळून आळंदी मरकळ मार्गे तुळापुरवरुन पुढे लोणीकंद येथे वाहनतळ ठिकाणी जातील.(मरकळ गाव, इंद्रायणी नदी पुलावर 8 फुट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेट लावले असल्याने त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने तेथून जावू शकणार नाहीत त्यापेक्षा कमी उंचीच्या फक्त अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)

पुणे शहरातून विश्रांतवाडी चौक तसेच आळंदी फाटा या ठिकाणावरुन आळंदीच्या दिशेने अनुयायांची वाहनास मज्जाव करण्यात आला आहे. ही वाहने वाघोली मार्गे लोणीकंदकडे वाहनतळाच्या दिशेने जातील. हा आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड,पोलीस वाहने, रुग्णवाहीका) अनुयायांची वाहनेखेरीज करून तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com