जाहिरात
Story ProgressBack

पालघरमध्ये दोन विचित्र अपघातात 4 जणांचा मृत्यू, तर 4 जखमी

पाली - विक्रमगड मार्गावर आलोंडे नाका येथे भरधाव ट्रकने  एस्टी बस,  दोन मोटारसायकल आणि कारला धडक दिली. तर वसई पूर्वेच्या सातीवली येथे घटली. यामध्ये भरधाव डंपरने पाच महिलांना चिरडले.

Read Time: 2 mins
पालघरमध्ये दोन विचित्र अपघातात 4 जणांचा मृत्यू, तर 4 जखमी

मनोज सातवी, पालघर

पालघरमध्ये दोन अपघातांच्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. वसई पूर्व परिसरात डंपरने पाच महिलांना चिरडलं. तर पाली - विक्रमगड मार्गावर आलोंडे नाका येथे भरधाव ट्रकने एसटी बस, कार आणि दुचाकीला धडक दिली. दोन्ही घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. 

पाली - विक्रमगड मार्गावर आलोंडे नाका येथे भरधाव ट्रकने  एस्टी बस,  दोन मोटारसायकल आणि कारला धडक दिली. त्यानंतर ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. या विचित्र अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. अपघातात आलोंडे गावातील लखमा वाघ आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.  ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 

दुसरी घटना वसई पूर्वेच्या सातीवली येथे घटली. यामध्ये भरधाव डंपरने पाच महिलांना चिरडले. मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्त्यावर सर्वत्र वाहतूक कोंडी सुरू आहे. अशाच वाहतूक कोंडीतून भरागाव वेगात मार्ग काढणाऱ्या डंपर उलट दिशेने येऊन त्याने अनेकांना चिरडले. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्या आहेत.

मंजिता जितू सरोज (वय 35) आणि जिंदादेवी शैलेश सिंग (वय 50) अशी मृत महिलांची नावे आहेत. भरधाव डंपरने दोन खाजगी बस आणि एका टँकरला देखील धडक दिली. पोलिसांना डंपर चालकाला ताब्यात घेतल आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
SSC Result : दहावीचा निकाल काही तासांवर, कधी आणि कुठे पाहाल? आताच लिंक सेव्ह करून ठेवा!
पालघरमध्ये दोन विचित्र अपघातात 4 जणांचा मृत्यू, तर 4 जखमी
NCP leader chhagan bhujbal on Manusmriti add in school syllabus
Next Article
राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असेपर्यंत मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही : छगन भुजबळ
;