जाहिरात
This Article is From Jul 09, 2024

Vasant More Shiv Sena : 150 किमीचं शक्तीप्रदर्शन, वसंत मोरेंचा दणक्यात ठाकरे गटात प्रवेश

हा माझा प्रवेश नाही तर मी पुन्हा एकदा शिवसेनेत आलो आहे, अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली.

Vasant More Shiv Sena : 150 किमीचं शक्तीप्रदर्शन, वसंत मोरेंचा दणक्यात ठाकरे गटात प्रवेश
मुंबई:

वंचितमधून पुणे लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर आज वसंत मोरे (Vasant More Shivsena) यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोडचिट्ठी देऊन वसंत मोरे यांनी वंचितकडून खासदारकी लढवली होती. यानंतर वसंत मोरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्री इथे वसंत मोरेंचा पक्ष प्रवेश पार पडला. 

वसंत मोरे यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात शिवसेनेपासून केली आहे. त्यामुळे हा माझा प्रवेश नाही तर मी पुन्हा एकदा शिवसेनेत आलो आहे, अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली. 25 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी काम करू असा विश्वास मोरेंनी यावेळी व्यक्त केला.   

Latest and Breaking News on NDTV

आगामी विधानसभेचा विचार करून वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं म्हटलं जात आहे. शक्ती प्रदर्शन करत वसंत मोरे मुंबईकडे रवाना झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते आणि गाड्यांचा ताफा होता. मुंबई-पुणे हायवेवर झेंडा फडकवत शक्ती प्रदर्शन करीत ते मातोश्रीला दाखल झाले आणि त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.