Video : कॅमेरा पाहताच फाइलने तोंड लपवलं, सुप्रिया सुळेंच्या गाडीतील 'ती' व्यक्ती कोण? चर्चांना उधाण

Supriya Sule : पुढील काही दिवसात मविआ आणि महायुतीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधून 'इन्कमिंग आणि आऊटगोईंग' सुरू असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडली आणि शरद पवार गटात प्रवेश केला. त्याशिवाय रामराजे निंबाळकरही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मविआ आणि महायुतीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अशा चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील त्या व्यक्तीची मोठी चर्चा सुरू आहे. पुण्यातील मोदीबाग या निवासस्थावरून निघताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीत एका नेत्याने फाइलने आपलं तोंड लपवल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सुप्रिया सुळेंच्या गाडीत बसलेली आणि फाइलने तोंड लपवणारी ती व्यक्ती कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

नक्की वाचा - तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी नामी शक्कल, माढ्यात प्रचाराचा भलताच ट्रेंड

सुप्रिया सुळे यांना पत्रकार परिषदेत या बाबत विचारल्यावर त्या उडवाउडवीचं उत्तर देऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, माझा नवरादेखील मीडिया शाय आहे. म्हणून कोण राजकीयच असेल असं नाही. माझ्या गाडीतून भरपूर लोक प्रवास करतात असंही त्या म्हणाल्या आणि त्यावर बोलणं टाळलं. पण आता तो नेता किंवा ती व्यक्ती कोण होती यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महायुतीला पुन्हा एकदा धक्का मिळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्ष मदत केल्याचा गौप्यस्फोट...
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी  शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मोठा खुलासा केला. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेंच्या विजयात अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटलांनी केलाय. इंदापूरच्या सभेत बोलतना हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली.