जाहिरात

तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी नामी शक्कल, माढ्यात प्रचाराचा भलताच ट्रेंड

नवा पक्ष आणि चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचासाठी माढयात मोहिते पाटील यांची नामी शक्कल लढवली आहे.

तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी नामी शक्कल, माढ्यात प्रचाराचा भलताच ट्रेंड
सोलापूर:

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवार आपल्या प्रचारासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. काही ठिकाणी नामी शक्कलही लढवली जात आहे. माढा मतदार संघातही असचं काही होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. त्यानंतर शरद पवारांना नवा पक्षा आणि चिन्ह मिळालं. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव मिळालं. त्यामुळे नवा पक्ष आणि चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचासाठी माढयात मोहिते पाटील यांची नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी केलेल्या या आयडियाची मतदार संघात चांगलीच चर्चा सुरू आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून 56 हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. आता विधानसभा मतदार संघात घरोघरी तुतारी चिन्ह पोहचवण्यासाठी, इच्छुक उमेदवार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी नामी शक्कल लढवली आहे. त्यासाठी त्यांनी मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना तुतारी चिन्ह असलेल्या वह्या वाटप करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी  मतदार संघात 55 हजार वह्यांचे वाटप करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे घर तीथे वही हे अभियानच त्यांनी हातात घेतले आहे.  

ट्रेंडिंग न्यूज - हरियाणातील पराभवानंतर ठाकरेंच्या काँग्रेसला कानपिचक्या, थेट सुनावलं

माढ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी पुण्यात इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे. अशा वेळी इच्छुकां पैकी एक असलेले शिवतेजसिंह मोहिते पाटील जणू प्रचारालाच लागले आहेत. त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या वह्या घरोघर पोहोचवला सुरुवात केली आहे. असं असलं तरी शरद पवार आणि विजयसिंह मोहीते पाटील हेच आपल्या उमेदवारी बाबत निर्णय घेतील असे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले आहे.

ट्रेंडिंग बातमी - कोकणात भाजपचे नमते? शिंदेंच्या सेनेला झुकते माप,भाजपच्या पदरात किती जागा?

माढा विधानसभा मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा ही समावेश आहे. शिवाय विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी आपल्या मुलासाठी माढ्यातून उमेदवारी मागितली होती. तर बबन शिंदे यांचा पुतण्या धनराज शिंदे यांनीही पवारांकडे उमेदवारी मागितली आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती सध्या या मतदार संघात आहे. त्यामुळे सगळे तगडे उमेदवार हे सध्या शरद पवार गटाकडे उमेदवारी मागत आहेत. अशा वेळी उमेदवारी कोणाला द्यायची हा खरा प्रश्न आहे. त्यातून बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.    

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
मोदींच्या स्वप्नाचा शिल्पकार, हरियाणात केला चमत्कार! मिस्टर डिपेंडेबल होणार भाजपाचा अध्यक्ष?
तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी नामी शक्कल, माढ्यात प्रचाराचा भलताच ट्रेंड
sharad-pawar-ready-to-hit-bjp-former-mp-sanjay-kakade-may-leave-party
Next Article
शरद पवारांचा नवा डाव, भाजपाला देणार हादरा! दसऱ्यानंतर बडा नेता करणार सीमोल्लंघन?