सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर; वडेट्टीवारांनी सांगितलं मुख्यमंत्री कुणाचा होणार 

सुप्रिया सुळे यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल यावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आधी जाहीर करावा अशी मागणी केली होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही मागणी फेटाळली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेत्यांची नावे समोर येत आहे. आता सुप्रिया सुळे यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, "सगळेच पक्षाचे का्र्यकर्ते आपल्या नेत्यांचे बॅनर लावतात. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शंभर टक्के महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार. महाविकास आघाडीची सत्ता येणार मुख्यमंत्री कोण होईल हे  महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि निर्णय घेतील."

(नक्की वाचा-  सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांच्या मनात काय?)

बारामती शहरातील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे युवक जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाभाई बागवान यांनी हे बॅनर लावले आहेत. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त हे बॅनर लावण्यात आले आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात ही बॅनरबाजी करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. 

( नक्की वाचा : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता नवी तारीख, हायकोर्टाकडून विनंती मान्य )

युगेंद्र पवार यांचा भला मोठा फोटो या बॅनरवर छापण्यात आला असून 'फिक्स आमदार' असं या बॅनरवर लिहण्यात आलं आहे. या बॅनरबाजीतून एकप्रकारे अजित पवारांना आव्हान देण्यात आल्याची चर्चा आता बारामतीत रंगू लागली आहे. 

Topics mentioned in this article