जाहिरात
This Article is From Apr 29, 2024

मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर; जायकवाडी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठा शिल्लक 

गेल्यावर्षी आजच्या दिवशी 50.65 टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात सद्यस्थितीत केवळ 9.29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर; जायकवाडी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठा शिल्लक 
मोसीन शेख :

एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ 9.29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत असल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 26 एप्रिलपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात तब्बल 1 हजार 415 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यातील अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले आहे. विहिरी बोरवेलचे पाणीदेखील आटले आहेत. तसेच मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा देखील झपाट्याने कमी होताना पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी 50.65 टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात सद्यस्थितीत केवळ 9.29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने जायकवाडी धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरासह उद्योजकांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र ७७ धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने चिंता वाढली आहे. 

नक्की वाचा - हिल स्टेशन झाली HOT; मुंबईलाही Heat wave चा इशारा

जायकवाडी धरणातील पाणीसाठा...

धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1498.57 फूट

धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये :  456.764 मीटर

एकूण पाणीसाठा दलघमी : 939.681 दलघमी

जिवंत पाणीसाठा दलघमी : 201.575 दलघमी

पाणीसाठा टक्केवारी : 9.29 टक्के

मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त 
पाणीसाठा दलघमी : 1099.597 दलघमी

मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी
50.65 टक्के

पाण्याचे बाष्पीभवन 1.142 दलघमी

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठवाड्यातील टँकर संख्या

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात 361 गाव आणि 53 वाड्यांवर 569 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जालना : जिल्ह्यात 276 गाव आणि 65 वाड्यांवर 408 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

बीड : जिल्ह्यात 240 गाव आणि 210 वाड्यांवर 310 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

परभणी : जिल्ह्यात 4 गावात 4 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

नांदेड : जिल्ह्यात 03 गाव आणि 12 वाड्यांवर 15 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

धाराशिव : जिल्ह्यात 64 गावात 101 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

लातूर : जिल्ह्यात 08 गावात 08 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com