पिंपरी चिंचवडमध्ये विविहितेने 4 वर्षांच्या आपल्या मुलासह इमारतीवरुन उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. वाकड परिसरातील रिगालिया या उच्च- भ्रू सोसायटीमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.कोमल आवटे असं 32 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. तर सोहम आवटे असं मुलीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल आणि संकेत यांचा 2018 मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून ते अमेरिकेतील टेक्सास शहरात राहत होते. कुटुंबियांनी पोलीस जबाबात दिलेल्या माहितीनुसार कोमलला सिजोफेनिया नावाच्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. गेली अनेक वर्षे तिच्यावर अमेरिकेत व भारतात उपचार देखील सुरू होते.
(नक्की वाचा - 'फैयाजला कडक शिक्षा द्या', नेहाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी हात जोडून मागितली माफी)
काही दिवसांपूर्वी कोमल भारतात आपल्या आई-वडील आणि सासू-सासऱ्यांनकडे या आजारावर उपचार घेण्यासाठी आली होती. सिजोफेमिया या आजारामुळे तिला वेगवेगळ्या प्रकारचे भास होत होते. भीती देखील जाणवत होती.
(नक्की वाचा - डॉक्टर नव्हते म्हणून कंपाउंडरने केली शस्त्रक्रिया अन् घडलं काही विचित्र)
आपल्या आजारपणामुळे मुलाच्या भवितव्याची कोमलला चिंता होती. मुलाचं पुढं काय होईल या चिंचेतून तिने शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना टोकाचा निर्णय घेतला. आपल्या मुलासह वाकड येथील रिगालिया सोसायटीच्या नवव्या मजल्यावरून कोमलने आपल्या मुलासह उडी घेत आत्महत्या केलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world