जाहिरात
Story ProgressBack

'फैयाजला कडक शिक्षा द्या', नेहाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी हात जोडून मागितली माफी

साधारण आठ महिन्यांपूर्वी नेहा हिरेमठच्या कुटुंबीयांनी फयाजच्या वडिलांकडे मुलाविरोधात तक्रार केली होती. फैयाज हा नेहाला त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Read Time: 2 min
'फैयाजला कडक शिक्षा द्या', नेहाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी हात जोडून मागितली माफी
हुबळी:

हुबळीमधील एका महाविद्यालयाच्या परिसराच्या आत काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची कथितपणे हत्या करणाऱ्या 23 वर्षीय फैयाजच्या वडिलांनी आपल्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करीत पीडित कुटुंबाची माफी मागितली. यावेळी ते म्हणाले की, माझ्या मुलाला कडक शिक्षा द्यायला हवी. फैयाजचे वडील बाबासाहेब सुबानी यांनी शनिवारी मीडियाशी बोलताना म्हणाले, त्यांना या घटनेबद्दल गुरुवारी सायंकाळी 4 वाजता कळालं आणि आपल्या मुलाच्या कृत्याने त्यांना मोठा आघात झाला आहे. 

या घटनेचा फैयाजच्या वडिलांना जबर धक्का बसला आहे. फैयाजला कडक शिक्षा व्हायला हवी, जेणे करून पुन्हा कोणीच असं पाऊल उचलणार नाही. मी हात जोडून नेहाच्या कुटुंबाची माफी मागतो. नेहा माझ्या मुलीसारखी होती. यावेळी सुबानी म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपासून ते पत्नीपासून वेगळे राहत आहेत आणि फैयाज आपल्या आईसोबत राहत होता. ते तीन महिन्यांपूर्वी शेवटचं आपल्या मुलाशी बोलले होते. 

साधारण आठ महिन्यांपूर्वी नेहा हिरेमठच्या कुटुंबीयांनी फयाजच्या वडिलांकडे मुलाविरोधात तक्रार केली होती. फैयाज हा नेहाला त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यावेळी सुबानी यांनी मुलाची चूक मान्य केली. नेहा आणि फैयाज एकमेकांवर प्रेम करीत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र फैयाजच्या वडिलांनी मुलाच्या कृत्याचा निषेध केला आहे. कोणत्याही महिलेविरोधात अशा प्रकारच्या अत्याचार सहन केला जाऊ शकत नाही. पत्रकार परिषदेत त्यांनी सर्वांसमोर हात जोडले आणि कर्नाटकच्या जनतेची माफी मागितली. माझ्या मुलाने चूक केली आहे. त्याला कायदेशीर शिक्षा दिली जावी. माझ्या मुलामुळे माझ्या चेहरावर मोठा डाग लागला आहे. दुसरीकडे नेहाच्या कुटुंबीयांकडून फैयाजला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. 

हे ही वाचा-'लव्ह जिहादमुळे मुलीची हत्या', काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

काय आहे प्रकरण?
18 एप्रिल 2024 च्या सायंकाळी 4.45 मिनिटांनी कर्नाटकातील बीवीबी कॉलेजमध्ये नेहा हिरेमठ परीक्षा देण्यासाठी खूप दिवसांनंतर महाविद्यालयात आली होती. तब्बल दोन महिले ती टायफॉइडने आजारी होती. परीक्षेसाठी ती महाविद्यालयात आली, परीक्षा दिल्यानंतर परीक्षा केंद्राच्या बाहेर आली. आईला फोन केला. याच्या काही सेकंदनात फैयाज नेहाशी बोलायला आला. मात्र नेहा काहीशी मागे हटली. यानंतर फैयाजने आपल्या खिशातून मोठा सुरा बाहेर काढला आणि नेहाच्या अंगावर सपासर वार केले. नेहा जमिनीवर कोसळली. यानंतरही फैयाज थांबला नाही त्याने नेहाच्या गळ्यावर दोन वेळा वार केले. तब्बल सात ते आठवेळा नेहावर चाकून हल्ला केला. काही मिनिटात हा प्रकार घडला. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिला रुग्णालया नेलं, मात्र त्यापूर्वीच नेहाचा मृत्यू झाला होता. 

नेहा आणि फैयाज दोघं एकमेकांवर प्रेम करीत असल्याचं सांगितलं जात आहे. फैयाजदा नेहासोबत लग्न करायचं होतं, मात्र फैयाजच्या आईने सुरुवातील करिअरकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. फैयाजच्या आईनेही या घटनेचा निषेध केला असून नेहाच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. या प्रकरणात फैयाजला कडक शिक्षा व्हावी अशी त्याच्या आईची मागणी आहे. भाजपकडून यात लव्ह जिदाहचा संशय व्यक्त केला जात आहे. 
 

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination