निनाद करमरकर, कल्याण
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी हितेश झेंडे याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलुंडच्या जंगलातून पोलिसांनी मोठ्या कसोशीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हितेश धेंडे याचे ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरक्षारक्षकांशी वाद झाला होता. याच रागातून त्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करण्याची धमकी इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
(नक्की वाचा- Mumbai News: एकाच नंबरच्या दोन गाड्या ताज हॉटेलमध्ये आल्या, अन् पुढे जे घडलं ते...)
आरोपीचा धमकीचा व्हिडीओ व्हायरल होताच शिवसैनिकांनी रविवारी रात्री ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी 6 तपास पथकं रवाना करत आरोपी हितेश झेंडे याचा कसून शोध घेतला.
(नक्की वाचा- Mumbai News: एकाच नंबरच्या दोन गाड्या ताज हॉटेलमध्ये आल्या, अन् पुढे जे घडलं ते...)
यावेळी मुलुंडच्या घोटीपाडा परिसरातील जंगलात हितेश पोलिसांना सापडला. त्याला ताब्यात घेऊन श्रीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world