
Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील प्रेमनगर टेकडी परिसरातील ही घटना आहे. या तरुणाची हत्या झाली आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सौरभ गायसमुद्रे असं या तरुणाचं नाव होतं. प्रेमनगर टेकडी भागातील पाण्याच्या टाकीच्या बाजूला जंगलात त्याचा झाडाला लटकलेला मृतदेह आज सकाळी आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
(नक्की वाचा- MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)
पोलिसांना तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आमच्या मुलाची हत्या झाल्याचा संशय गायसमुद्रे कुटुंबाने व्यक्त केला आहे. पोलिसांनी सखोल तपास करून आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world