
Mumbai News : नाहूरमध्ये 100 कोटी रुपये खर्चून प्राणीसंग्रहालय आणि पक्षीगृह उभारण्यासाठी 4.4 एकर जमीन आरक्षित करण्याची प्रक्रिया नगरविकास विभागाने सुरू केली आहे. नगरविकास विभागाने 7 एप्रिल रोजी एक नोटीस जारी करून भूखंड राखीव करण्यासाठी सूचना किंवा हरकती मागवल्या होत्या. या भूखंडावर सध्या एक उद्यान आहे, ज्यावर बांधकाम करण्यास परवानगी नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाहूरमध्ये प्राणीसंग्रहालय आणि पक्षी संग्रहालय केंद्र उघडण्याची योजना गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. मुंबईचे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पूर्व उपनगरांमध्ये एक पर्यटन स्थळ असण्याची कल्पना मांडली होती. सध्या, पूर्व उपनगरांमध्ये निसर्गप्रेमींसाठी पवई तलावातील विहार आणि भांडुप पंपिंग स्टेशन ही एकमेव ठिकाणे आहेत, जिथे लोक फ्लेमिंगोसह पक्षी पाहण्यासाठी जातात.
(नक्की वाचा- कोल्हापुरातील 10 गावातील नागरिक होणार मालामाल; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं आश्वासन)
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, किमान 100 कोटी रुपये खर्चाच्या या नवीन प्राणीसंग्रहालय आणि पक्षीगृहाच्या प्रकल्पाला भाजपचे मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी पाठिंबा दिला आहे. "हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल असे, मला बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितल्याले मिहिर कोटेचा यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- बदलापुरात घरे महागणार; पंतप्रधान आवास योजनेतील 8 लाखांचं घर दुपटीने महागलं)
बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या संग्रहालयात आफ्रिकन राखाडी पोपट, काळे हंस,पांढरे मोर यासह 22 पक्ष्यांच्या प्रजाती असतील. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यासारख्या प्रदेश आणि देशांसह जगभरातील उद्यानांमधून हे पक्षी मुंबईत आणले जातील.
प्रकल्पाच्या निविदा जूनपर्यंत जारी केल्या जातील आणि राज्य सरकारची बीएमसी निवडणुकीपूर्वी पावसाळ्यात भूमिपूजन समारंभ आयोजित करण्याची योजना आहे.