
England vs West Indies, 2nd T20: सोमवार 9 जून 2025 ला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात असा काही पराक्रम झाला आहे,त्यामुळे क्रिकेट जगत आश्चर्यचकित झाले आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने 18.3 षटकांत 6 विकेट्स गमावून 199 धावा करून सामना जिंकला. या सामन्यात एकूण 374 धावा झाल्या. असं असलं तरी या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अनोखा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या सामन्यात कोणत्याही एका खेळाडूने 50 हून अधिक धावा केल्या नाहीत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इतक्या धावा होवून एकही खेळाडूने 50 धावा केल्या नाहीत हा एक विश्वविक्रम ठरला आहे. यापूर्वी 2024 मध्ये बेल्जियम आणि ग्वेर्नसे यांच्यातील सामन्यात कोणत्या संघाच्या एका ही खेळाडूने 50 हून अधिक धावा केल्या नव्हत्या. पण दोन्ही संघांनी मिळून एकूण 371 धावा केल्या होत्या.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा एक इतिहास रचला गेला आहे. Most runs in a T20I match Without any Individual 50+ score
- 374 धावा - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2025*
- 371 धावा - बेल्जियम विरुद्ध ग्वेर्नसे, 2024
- 365 धावा - न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 2013
- 351 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 2024
- 349 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 2007
याशिवाय, दुसऱ्या टी-20 सामन्यात जोस बटलरने 36 चेंडूंमध्ये 47 धावांची खेळी केली. बटलरने 47 धावांची खेळी करत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. बटलर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील चौथा फलंदाज बनला आहे.
सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय धावा (Most runs in career in T20Is - Batting records)
- 4,231 – रोहित शर्मा (151 डाव)
- 4,223 – बाबर आझम (121 डाव)
- 4,188 – विराट कोहली (117 डाव)
- 3,668 – जोस बटलर (125 डाव)
- 3,656 – पॉल स्टर्लिंग (147 डाव)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world