जाहिरात

Smriti Mandhana News: लग्न मोडलं... विषय संपवायचाय... स्मृती मानधनाने सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट

Smriti Mandhana Wedding Called Off: टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाने अखेर लग्नाबाबत मौन सोडलंय.

Smriti Mandhana News: लग्न मोडलं... विषय संपवायचाय... स्मृती मानधनाने सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट
"Smriti Mandhana Wedding Called Off: स्मृती मानधनाने लग्नाबाबत शेअर केली पोस्ट"
Smriti Mandhana Insta

Smriti Mandhana Wedding Called Off: टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाने आपल्या लग्नाबाबत अखेर मौन सोडलंय. पलाश मुच्छलसोबत मोडल्याची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिलीय. स्मृतीने सोशल मीडियावर मोठी पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिलीय. 23 नोव्हेंबर रोजी स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा संगीतकार पलाश मुच्छलचं लग्न होणार होतं. पण स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने लग्न पुढे ढकलल्याची माहिती समोर आली होती. आता स्मृतीनंच स्पष्ट शब्दांत तिचं आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडल्याचं सांगितलंय. 

स्मृती मानधनाची सोशल मीडियावर लग्नाबाबत पहिली पोस्ट

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Smriti Mandhana Instagram

Smriti Mandhana Palash Muchhal: स्पेशल 'SM 18' टॅटू ते प्रपोजल... स्मृती-पलाशचं लग्न मोडण्यापर्यंत काय-काय घडलं?

(नक्की वाचा: Smriti Mandhana Palash Muchhal: स्पेशल 'SM 18' टॅटू ते प्रपोजल... स्मृती-पलाशचं लग्न मोडण्यापर्यंत काय-काय घडलं?)

स्मृती मानधनाने पोस्टमध्ये नेमके काय म्हटलंय?

स्मृती मानधनाने पोस्टमध्ये लिहिलंय की,"मागील काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत आणि आता मी बोलणं महत्त्वाचं आहे,असे मला वाटतं. मी माझ्या गोष्टी अतिशय खासगी ठेवते आणि मला माझे व्यक्तिमत्त्व असंच ठेवायचंय, पण मी हे स्पष्ट करू इच्छिते की लग्न रद्द करण्यात आलंय. हा विषय येथेच संपवू इच्छिते आणि तुम्हा सर्वांना तसेच करण्याची विनंती करते. दोन्ही कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करावा. आपणा सर्वांसमोर एक मोठे उद्देश आहे, असे मला वाटतं आणि देशाचे सर्वोच्च स्तरावर कायम प्रतिनिधित्व करणं, हे माझे उद्देश आहे. शक्य आहे तोपर्यंत मला भारत देशासाठी खेळायचंय, ट्रॉफी जिंकत राहायचंय आणि हेच माझं लक्ष्य असेल. तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार, आता पुढे जाण्याची वेळ आलीय."

Smriti Mandhana News: लग्न मोडण्यासह स्मृती मानधनाने पलाश आणि पलक मुच्छलबाबत घेतला आणखी एक मोठा निर्णय

(नक्की वाचा: Smriti Mandhana News: लग्न मोडण्यासह स्मृती मानधनाने पलाश आणि पलक मुच्छलबाबत घेतला आणखी एक मोठा निर्णय)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Palaash Muchhal Instagram

...तर कायदेशीर कारवाई करेन: पलाश मुच्छलनंही शेअर केली पोस्ट

पलाश मुच्छलनेही म्हटलंय की, "आयुष्यात मी पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. माझ्यासाठी सर्वात पवित्र असलेल्या गोष्टीबद्दलच्या निराधार अफवांवर लोक इतक्या सहजपणे प्रतिक्रिया व्यक्त करतायेत हे पाहणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आहे आणि मी त्याचा सामना करेन. एक समाज म्हणून कोणतीही गोष्ट पडताळून न पाहता एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेणे थांबवायला हवं. माझी टीम खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करेल. या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार"

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com