जाहिरात

Smriti-Palash Wedding: स्मृती-पलाशच्या लग्नाचं गूढ वाढलं; पलक मुच्छल म्हणाली, 'आम्ही फक्त खंबीर...'

Palash Muchhal And Smriti Mandhana Marriage: 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सांगलीमध्ये  होणारा हा विवाह सोहळा ऐनवेळी थांबल्याने सगळ्यांनाच धक्का बसला.

Smriti-Palash Wedding: स्मृती-पलाशच्या लग्नाचं गूढ वाढलं; पलक मुच्छल म्हणाली, 'आम्ही फक्त खंबीर...'
Palash Muchhal And Smriti Mandhana Marriage : स्मृती आणि पलाशचं लग्न का टळलं? याचा खुलासा पलक मुच्छलनं केला आहे.
मुंबई:

Palak Muchhal on Palash Muchhal And Smriti Mandhana Marriage:  भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार-चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांचं लग्न या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी विवाहांपैकी एक मानलं जात होतं. मात्र, 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सांगलीमध्ये  होणारा हा विवाह सोहळा ऐनवेळी थांबल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. आता या घटनेच्या काही दिवसांनंतर  पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छलने पहिल्यांदाच या कठीण काळातून कुटुंब कसं जात आहे, हे सांगितलं आहे.

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांची जोडी चाहत्यांना आवडते. या दोघांचा विवाह होणार हे निश्चित झाल्यावर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, पण ऐनवेळी लग्न थांबवल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आता पलक मुच्छलने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांच्या कुटुंबाच्या भावना समोर आल्या आहेत.

नेमकं काय झालं?

लग्नाच्या दिवशी सकाळीच स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही तासांतच, पलाश मुच्छल यालाही व्हायरल आणि ॲसिडिटीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. यामुळे दोन्ही कुटुंबांसमोर एकाच वेळी मोठे संकट उभे राहिले आणि नाईलाजाने संपूर्ण विवाह सोहळा थांबवावा लागला. 

( नक्की वाचा : Palash Muchhal : 'स्मृतीपेक्षाही दोघांची जास्त जवळीक', पलाश ढसढसा रडला, आईनं सांगितलं 'त्या' दिवशी काय घडलं? )

त्यावेळी पलक मुच्छलने केवळ एवढेच सांगितले होते की, लग्न "पोस्टपोन" करण्यात आले आहे. नंतर दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, परंतु लग्नाच्या नवीन तारखेबद्दल कोणतेही अपडेट्स न मिळाल्याने सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या.

कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया

'फिल्मफेअर'शी बोलताना पलक म्हणाली, “कुटुंबाने खूप कठीण काळ पाहिला आहे. आम्हाला फक्त सकारात्मक राहायचं आहे, सकारात्मकता पसरवायची आहे आणि खंबीर राहायचं आहे.” पलकच्या या प्रतिक्रियेमुळे, दोन्ही कुटुंबे अजूनही भावनिकरित्या या धक्क्यातून सावरत आहेत, हे पहिल्यांदा स्पष्ट झाले.

या घटनेनंतर स्मृती आणि पलाश दोघेही सोशल मीडियावरून जवळपास पूर्णपणे गायब झाले आहेत. स्मृतीने तर तिच्या साखरपुड्याशी आणि लग्नाशी संबंधित असलेले सर्व पोस्ट्सदेखील डिलीट केले. या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम बायोमध्ये "ईविल आय" (नजर लागू नये म्हणून वापरला जाणारा इमोजी) देखील जोडला, ज्यामुळे पुन्हा नवीन अंदाज लावले जाऊ लागले.

पलाश  सार्वजनिक ठिकाणी दिसला होता. आधी एअरपोर्टवर आणि नंतर वृंदावन येथील एका आश्रमात मास्क घातलेला त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. काही रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला की लग्नाची नवीन तारीख 7 डिसेंबर आहे, पण स्मृतीच्या भावाने लगेच स्पष्ट केले की लग्न अजूनही 'होल्ड'वर आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे चाहते आणि मीडिया या दोघांनाही आश्चर्य वाटले आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष  लग्नाची नवीन तारीख कधी निश्चित होईल याकडे लागलं आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com