जाहिरात

Ind vs Eng: भारताचा लॉर्ड्स टेस्टमध्ये पराभव, जाडेजाची एकाकी झुंज अपयशी, इंग्लंडची मालिकेत आघाडी

रविंद्र जडेजा आणि नितीश रेड्डी यांच्यात चांगली भागिदारी झाली होती पण ख्रिस व्होक्सने रेड्डीला बाद करत सामना जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.

Ind vs Eng: भारताचा लॉर्ड्स टेस्टमध्ये पराभव, जाडेजाची एकाकी झुंज अपयशी, इंग्लंडची मालिकेत आघाडी
फोटो सौजन्या- ICC

लॉर्ड्स कसोटी सामना जिंकण्याची संधी भारताने हातची घालवली. इंग्लंडने दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव पत्त्या सारखा कोसळला. भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी चार विकेट गमावल्या होत्या. त्याच वेळी इंग्लंडने सामन्यावर आली पकड मजबूत केली होती.सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने आपल्या गोलंदाजीची धार आणखी तिव्र केली. ज्यांच्यावर सामन्याची भिस्त होती त्यांनाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी बाद केले. आधी ऋषभ पंत,नंतर के.एल. राहुल त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला बाद करत इंग्लंडने सामन्यावर आपली पकड अधिकच भक्कम केली. रविंद्र जडेजा आणि नितीश रेड्डी यांच्यात चांगली भागिदारी झाली होती पण ख्रिस व्होक्सने रेड्डीला बाद करत सामना जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि बुमराह यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. बुमराह तब्बल 54 चेंडू खेळला. त्याने पाच धावा केल्या पण त्याला बेन स्टोकने आऊट केले.  त्यानंतर जडेजाने भारताच्या विजयाची अपेक्षा जिवंत ठेवली होती. पण महम्मद शिराज दुर्दैवी पणे बाद झाला. भारताचा डाव 170 धावात आटोपला. इंग्लंडचा 22 धावांनी विजय झाला. शिवाय पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने दोन एक अशी आघाडी ही घेतली आहे.  

रविद्र जाडेजा 61 धावांवर नाबाद राहीला. त्याने एकाबाजून भारताची बाजू लावून धरली होती. या 61 धावा बनवताना त्याने तब्बल 181 चेंडूंचा सामना केला. भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण त्याच वेळी शिराज दुर्दैवीपणे बाद झाला.  जाडेजाची एकाकी झुंज अपयशी ठरली.  जाडेजा शिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर ठाण मांडता आले नाही.  दरम्यान त्या आधी भारतीय गोलंदाजांनी चांगली बॉलिंग करत इंग्लंजला 192 धावांवर रोखले होते.  भारताला विजयासाठी 193 धावांची गरज होती. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकी समोर नांदी टाकली. वॉशिंग्टनने सुंदर बॉलिंग करत 12 ओव्हर्समध्ये 4 विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने जो रुट, बेन स्टोक, जेम स्मिथ या आघाडीच्या फलंदाजांना क्लिन बोल्ड केले. त्यामुळे इंग्लंडचा डाव 192 धावांत आटोपला.

IND vs ENG: शुबमन गिल अंपायरवर चिडला, गावस्करही संतापले! लॉर्ड्स टेस्टमध्ये भर मैदानात मोठा राडा

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताने पहिल्या सत्रात इंग्लंडला एका पाठोपाठ चार धक्के दिले. महम्मद सिराजने अप्रतिम स्पेल टाक दोन फलंदाजाना बाद केले. त्याने बेन डकेत आणि ओली पोप यांना आऊट केले. तर सलामिविर झेकला नितीशकुमार रेड्डीने माघारी धाडले. त्यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रुक यांची चांगली भागिदारी झाली होती. त्याच वेळी आकाश दीपने हॅरी ब्रुकला क्लिनबोल्ड करत इंग्लंडवर दबाव टाकला.

नक्की वाचा - IND Vs ENG: शेवटच्या ओव्हरमध्ये हायहोल्टेज ड्रामा! शुभमन गिल थेट भिडला, पाहा VIDEO

जो रुट आणि कॅप्टन बेन स्टोक यांची जोडी चांगली जमली होती. त्यावेळी कॅप्टन शुबमन गिलने वॉशिंग्टन सुंदरला बॉलिंगसाठी बोलवले. त्याने ही आपल्या कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला. आधी त्याने जो रुट मग बेन स्टोकला क्लिन बोल्ट केले. त्यानंतर आलेल्या जेम स्मिथ यालाही जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहू दिले नाही. त्याला ही त्याने बोल्ड केले. बुमरानेही मग तळाच्या दोन फलंदाजांना आऊट करत इंग्लंडचा डाव गुंडाळला. इंग्लंडला 192 धावा करता आल्या.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com