जाहिरात

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाची मालिका सुरूच, धोनीची फटकेबाजी व्यर्थ

त्या आधी पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. पंजाबची सुरूवात चांगली झाली नाही.

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाची मालिका सुरूच,  धोनीची फटकेबाजी व्यर्थ
सौजन्य- BCCI

पंजाबने चेन्नईचा 18 रन्सनी पराभव केला. या पराभवामुळे चेन्नईची पराभवाची मालिका सुरूच राहीली आहे. पंजाबने चेन्नईसमोर 220 धावांचे लक्ष दिले होते. या लक्षाचा पाठलाग करताना सहा ओव्हर्समध्ये 61 धावांची सलामी रचिन रविंद्र डेव्हन कॉन्वे याने दिली. 23 चेंडूत 36 धावांची खेळी करून रचिन हा बाद झाला. कॅप्टन ऋतूराज गायकवाड मात्र पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारायला अपयशी ठरला. त्याला केवळ एक धावा करता आली. त्याला लॉकी फर्ग्यूसनने बाद केले. त्यानंतर  डेव्हन कॉन्वे आणि शिवम दुबे यांनी चेन्नईचा डाव सावरला. शिवम दुबे  27 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. तर डेव्हन कॉन्वे या 69 धावांवर रिटार्ड आऊट झाला. त्याने दोन षटकार आणि सहा चौकार लगावले. त्यानंतर आलेल्या महेंद्र सिंह धोनीने फटकेबाजी करत सामन्यात चुरस निर्माण केली. पण त्याची फटकेबाजी चेन्नईला विजय मिळवून देवू शकली नाही. त्याने 12 चेंडूत 27 धावा केल्या. या खेळीत त्याने तिन सिक्स लगावले. चेन्नईला 20 षटकात 201 धावा करता आल्या. त्या बदल्यात पाच फलंदाज बाद झाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्या आधी पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. पंजाबची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीविर प्रभसिमरन सिंग हा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार श्रेयस अय्यरही जास्त वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाही. त्याला केवळ नऊ धावा करता आल्या. त्याला खलील अहमदने क्लिन बोल्ड केले. अय्यरनंतर मार्कस स्टोइनिस, नेहल वाधेरा, ग्लेन मॅक्सवेल हे ही अपयशी ठरले. एक वेळ पंजाबची स्थिती 5 बाद 83 झाली होती. त्यानंतर प्रियांश आर्य आणि शशांक सिंग यांनी पंजाबचा डाव सावरला. 

ट्रेंडिंग बातमी - Priyansh Arya : फक्त 39 बॉलमध्ये CSK विरुद्ध सेंच्युरी, एका ओव्हरमध्ये मारले आहेत 6 सिक्स !

प्रियांशनं एका बाजूनं आक्रमक बॅटिंग करत फक्क 39 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावली. त्यानं या खेळीत 7 फोर आणि 9 सिक्स लगावले. आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि नूर अहमद या सीएसकेच्या स्पिन बॉलिंगचा त्यानं सहजपणे सामना केला. नूरनं त्याला अखेर आऊट केलं. पण, त्यापूर्वी त्यानं 42 बॉलमध्ये 103 रन काढले होते. या खेळीत 7 फोर आणि 9 सिक्स मारले. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 245.23 होता. त्याला दुसऱ्या बाजूने शशांक सिंग यांने चांगली साथ दिली. त्याने 36 बॉलमध्ये 52  धावा केल्या. या खेळीत त्याने 3 सिक्स आणि 2 फोर लगावले. प्रियांश आऊट झाल्यानंतर शशांकला मार्को यान्सिन याची साथ मिळाली. त्याने 19 चेंडूत 34 धावा केल्या. त्यात त्याने दोन सिक्स आणि दोन फोर लगावले. पंजाबने 20 ओव्हर्समध्ये 219 धावा केल्या. पंजाबचे सहा फलंदाज बाद झाले. 

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 : ठाकूर तुला मानलं रे... 5 वाईड बॉल ठरले मॅचचा टर्निंग पॉईंट, 'लॉर्ड'चं भन्नाट डोकं समजलं का?

तर चेन्नई सुपर किंग्ज खलील अहमद आणि आर अश्वीन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. मुकेश चौधरी आणि नूर अहमद यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. रविंद्र जडेजा वगळता चेन्नईच्या सर्वच बॉलर्सची पंजाबच्या फलंदाजांनी धुलाई केली. जडेजाने आपल्या तीन ओव्हर्समध्ये केवळ 18 धावा दिल्या. त्याला एकही गडी बाद करता आला नाही. मथीशा पथिरना याच्या चार ओव्हर्समध्ये सर्वाधिक 52 धावा चोपल्या गेल्या.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: