IND vs ENG : ...तर ऋषभ पंतने मँचेस्टर कसोटी सामन्यात खेळू नये - रवी शास्त्रींचं मोठं विधान

सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत ऋषभच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्या आहेत. आतापर्यंतच्या मालिकेत पंतच्या नावावर 425 धावा जमा आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या Anderson-Tendulkar Trophy मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 22 धावांनी निसटता पराभव स्विकारावा लागला. गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी करत भारताला विजयासाठी सोपं आव्हान दिलं होतं, परंतु दुसऱ्या डावात महत्त्वाच्या भारतीय फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्याने यष्टीरक्षण न करता फक्त फलंदाजीवर भर दिला. त्याच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून ध्रुव जुरेलने विकेटकिपींग केली. परंतु अशा परिस्थितीतही दुसऱ्या डावात ऋषभ स्वस्तात बाद झाल्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.

ऋषभ पंत चौथ्या कसोटी सामन्यातही खेळणार -

तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक Ryan ten Doeschate यांनी ऋषभ पंत चौथ्या कसोटीत खेळेल असे संकेत दिले होते. फलंदाज म्हणून ऋषभ पंत सध्या ज्या फॉर्मात आहे ते पाहता त्याला खेळण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा कल असल्याचं समोर येत आहे.

परंतू भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते ऋषभ पंतला फक्त फलंदाज म्हणून संघात खेळवणं धोकादायक ठरु शकतं, अशाने त्याची दुखापत आणखी बळावू शकते असंही रवी शास्त्री म्हणाले. जर ऋषभची दुखापत बरी झाली नसेल तर त्याने चौथ्या कसोटीत आराम करुन अखेरच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज व्हावं असं शास्त्रींनी सांगितलं.

Advertisement

...तर ऋषभ पंतने आराम करावा - रवी शास्त्री

ऋषभला फिल्डींग करावी लागेल आणि जर त्याने ती केली...तर परिस्थिती बिघडेल. ग्लोव्ह्ज असताना त्याला थोडंतरी प्रोटेक्शन असतं, परंतु ग्लोव्ह्जशिवाय तो मैदानात आला आणि त्याला दुखापत झालेल्या जागेवर परत लागलं तर चांगलं होणार नाही. यामुळे दुखापत आणखी बळावू शकते. त्याला विकेटकिपींगही करायची आहे आणि बॅटींगही करायची आहे. दोघांपैकी एक तो नाही करु शकत. जर त्याला फ्रॅक्चर झालं असेल तर त्याने आराम करावा आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज व्हावं. पण जरं असं नसेल तर त्याच्याकडे बरं होण्यासाठी 9 दिवस आहेत, रवी शास्त्री ICC शी बोलत होते.

हे ही वाचा - IND vs ENG : तुझ्याकडून 30 धावांची अपेक्षा नाहीये, माजी भारतीय खेळाडूने Karun Nair ला सुनावलं

Advertisement

कसोटी मालिकेत ऋषभ पंत चांगल्या फॉर्मात - 

सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत ऋषभच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्या आहेत. लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभने दोन्ही डावात शतक झळकावून, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी भन्नाट कामगिरी करणारा दुसरा विकेटकिपर होण्याचा मान पटकावला होता. पहिल्या डावात ऋषभने 134 तर दुसऱ्या डावात 118 धावा केल्या होत्या.

हे ही वाचा - IND vs ENG: चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का, स्टार फास्ट बॉलर जखमी

याव्यतिरीक्त दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही ऋषभने 65 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आतापर्यंतच्या मालिकेत पंतच्या नावावर 425 धावा जमा आहेत.

Advertisement

हे ही वाचा - Ravindra Jadeja Records : लॉर्ड्सवर रविंद्र जाडेजाची दमदार खेळी; 'हे' विक्रम केले नावे