- राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 37 चेंडूत 103 धावा केल्या
- वैभवने आपल्या फलंदाजीचे श्रेय यशस्वी जायसवाल यांना दिले आणि त्याला यश भैया म्हणून संबोधले
- वैभवने सांगितले की यश भैय्याने मोकळेपणाने खेळण्याचा सल्ला दिला होता
IPL 2026: राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने अवघ्या 37 चेंडूत 103 धावांची वादळी खेळी करत जयपूरचे मैदान गाजवले. या खेळीनंतर त्याने आपल्या यशाचे श्रेय 'यश भैया' ला दिले आहे. त्यानंतर हा जश भैय्या कोण याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे उत्तर स्वत: वैभव सुर्यवंशीनेच दिले आहे. त्यांनी आपल्या स्फोटक फलंदाजीचे श्रेय ही या भैय्याला दिले आहे.
सामन्यानंतर बोलताना वैभवने सांगितले की, पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा कोणताही पूर्वनियोजित प्लॅन नव्हता. मात्र, सामन्यानंतर यशस्वी जायसवालशी झालेल्या चर्चेचा त्याला फायदा झाला. "यश भैय्याने मला सांगितले होते की आज आपल्याला मोकळेपणाने खेळायचे आहे. जर पहिल्या चेंडूपासूनच संधी मिळाली, तर आपल्या खेळावर विश्वास ठेवून फटकेबाजी कर," असे वैभवने स्पष्ट केले. त्याचा फायदा झाला. त्यानुसार खेळ केला असं ही सांगितलं. शिवाय यश भैय्या म्हणजे यशस्वी जायसवाल असल्याचं ही त्याने स्पष्ट केलं.
साधारणपणे फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये सावध पवित्रा घेतात, पण वैभवने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. यावर तो म्हणाला, "मी जास्त विचार केला नव्हता, फक्त चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळलो. खेळपट्टी चांगली होती आणि मला माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता." विरोधी संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलताना तो म्हणाला की, मी नेहमी गोलंदाजांचा अभ्यास करतो आणि बाउंड्री किती लांब आहे याचा विचार करून शॉट निवडतो.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 228 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावसंख्येवर समाधान व्यक्त करताना वैभवने सांगितले की, हे एक आव्हानात्मक टार्गेट होते. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि आखलेल्या नियोजनाची अचूक अंमलबजावणी करून आम्ही हा विजय मिळवू, असा विश्वास त्याने व्यक्त केला होता. पण वैभव सूर्यवंशीचे वादळ शतक फेल गेले. हैदराबादने राजस्थानचा पराभव केला. वैभवने आयपीएल करिअरमधील दोन शतकं ठोकली आहे.
राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली होती. त्याने 278.37 च्या स्ट्राइक रेटने त्याने 103 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 12 उत्तुंग षटकार लगावले. "यश भैयाने मला भीतीमुक्त खेळण्याचा सल्ला दिला होता आणि मी तेच मैदानात उतरवले," असे वैभवने अभिमानाने सांगितले. खेळपट्टीचा अचूक अंदाज आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे शतक पूर्ण केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world