जाहिरात

Vaibhav Sooryavanshi VIDEO: कोण आहेत 80 वर्षीय अनुरा टेनेकून? ज्यांना पाहताच वैभव सूर्यवंशी पाया पडला

Vaibhav Sooryavanshi VIDEO: वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत अनुरा टेनेकून यांच्या पाया पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होते. कोण आहेत अनुरा टेनेकून? वाचा सविस्तर माहिती...

Vaibhav Sooryavanshi VIDEO: कोण आहेत 80 वर्षीय अनुरा टेनेकून? ज्यांना पाहताच वैभव सूर्यवंशी पाया पडला
"Vaibhav Sooryavanshi VIDEO: वैभव सूर्यवंशी ज्यांच्या पाया पडला ते कोण?"
Social Media

Vaibhav Sooryavanshi VIDEO: टीम इंडियाचा धुरंधर बॅटर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.  जिथे तो भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान 'ए' टीमदरम्यान सुरू असलेल्या ट्राय वन-डे सीरिजमध्ये सहभागी झाला आहे. तिथला त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो श्रीलंकेतील माजी दिग्गज क्रिकेटर अनुरा टेनेकून (Anura Tennekoon)  यांच्या पाया पडताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे लोकांमध्ये अनुरा टेनेकून यांच्याबाबत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. तुम्हालाही अनुरा टेनेकून कोण आहेत हे जाणून घ्यायचे आहे का? तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा....

कोण आहेत अनुरा टेनेकून?  Who Is Anura Tennekoon

अनुरा टेनेकून हे श्रीलंकन टीमचे माजी क्रिकेटपटू आहेत. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वन-डे फॉरमॅटमध्ये श्रीलंकेचे कॅप्टनपद भूषवणारे ते पहिले व्यक्ती आहेत. अनुरा टेनेकून यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1946 रोजी अनुराधापूर येथे झाला होता. आता त्यांचे वय 79 वर्षे इतके आहे. अनुरा हे उजव्या हाताने बॅटिंग आणि डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स बॉलिंग करायचे.

(नक्की वाचा : VIDEO: वैभव सूर्यवंशी संतापला! थेट अंगावर धावला, धक्का दिला; मॅचमध्ये जे झालं त्याने क्रीडाविश्व हादरलं)

अनुरा टेनेकून यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर

अनुरा टेनेकून आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रीलंकेकडून एकूण चार वन-डे सामने खेळण्यात यशस्वी ठरले. या दरम्यान त्यांनी चार डावांत 34.25च्या सरासरीने 137 रन्स केले आहेत.  त्यांनी खेळलेली 59 धावांची अर्धशतकी खेळी ही एका सामन्यातील त्यांची सर्वोच्च खेळी ठरली.

अनुरा टेनेकून यांचे देशांतर्गत क्रिकेट करिअर

तर अनुरा टेनेकून यांच्या देशांतर्गत क्रिकेट करिअराबाबत बोलायचे झाले तर ते एकूण 61 फर्स्ट क्लास आणि 18 लिस्ट ए सामने खेळले आहेत. जिथे त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 107 डावांत 36.26च्या सरासरीने 3 हजार 481 आणि लिस्ट ए च्या 16 डावांत 16.11च्या सरासरीने 274 रन्स केले आहेत.  

अनुरा टेनेकून यांच्या बॅटमधून क्रिकेटप्रेमींना फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकूण पाच शतके आणि 19 अर्धशतके पाहायला मिळाली. तर लिस्ट 'ए'मध्ये ते केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. बॉलिंगदरम्यान फर्स्ट क्लासमध्ये त्यांनी दोन विकेट्स घेतल्या. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com