जाहिरात

ICC चा ऐतिहासिक निर्णय! महिला वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणार भली मोठी रक्कम, किती ते माहित आहे का?

पुरुष 2023 वनडे वर्ल्ड कपची बक्षीस रक्कम 10 दशलक्ष डॉलर्स होती, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे 88.29 कोटी रुपये होती.

ICC चा ऐतिहासिक निर्णय! महिला वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणार भली मोठी रक्कम, किती ते माहित आहे का?

Womens World Cup 2025 Prize Money: महिला वर्ल्ड कपच्या (Womens World Cup 2025 Prize Money) बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेच्या बक्षीस रकमेत 297% नी वाढ करण्यात आली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. आयसीसीने महिला वर्ल्ड कपची बक्षीस रक्कम $13.88 दशलक्ष केली आहे. ती भारतीय रुपयांमध्ये 122 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी हा निर्णय घेऊन महिला क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघासाठी 4.48 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ते भारतीय रुपयांमध्ये तब्बल 40 कोटी रुपये आहे. तर, फायनलमध्ये हरणाऱ्या संघाला 2.24 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये मिळतील.

सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघाला सुमारे 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. ग्रुप स्टेजमध्ये एक सामना जिंकणाऱ्या संघाला 34 हजार डॉलर्स म्हणजेच 30.19 लाख रुपये मिळतील. याशिवाय, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला 6.16 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या संघाला 2.5 कोटी रुपये मिळतील. एखादा संघ सामना जिंकला किंवा नाही, तरी प्रत्येक संघाला किमान 2 कोटी 50 लाख रुपये देण्याची घोषणा आयसीसीने केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पुरुष 2023 वनडे वर्ल्ड कपची बक्षीस रक्कम 10 दशलक्ष डॉलर्स होती, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे 88.29 कोटी रुपये होती.

नक्की वाचा - Rahul Dravid : 'द वॉल' ची प्रांजल कबुली, सचिन तेंडुलकर, गांगुली यांच्याकडून आदर मिळवणं होतं मोठं आव्हान!

हा निर्णय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरेल

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, “ही घोषणा महिला क्रिकेटच्या प्रवासात एक निर्णायक टप्पा ठरेल." जय शाह पुढे म्हणाले, "बक्षीस रकमेतील चार पटीने झालेली वाढ महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला क्रिकेटच्या दीर्घकालीन विकासासाठी असलेली आमची स्पष्ट बांधिलकी दर्शवते. आमचा संदेश सोपा आहे, जर महिला क्रिकेटपटूंनी हा खेळ व्यावसायिकरित्या निवडला तर त्यांना पुरुषांप्रमाणेच संधी आणि सोयी सुविधा दिल्या जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. पुरूष आणि महिला असा भेद क्रिकेटमध्ये राहाणार नाही. 

महिला वर्ल्ड कप बक्षीस रक्कम (Womens World Cup 2025 Prize Money)


किती मिळेल                बक्षीस रक्कम डॉलरमध्ये           बक्षीस रक्कम भारतीय रुपयांमध्ये

  • विजेता                            4.48 दशलक्ष                             39.4 कोटी
  • उपविजेता                       2.24 दशलक्ष                             19.71 कोटी
  • सेमीफायनलिस्ट               1.12 दशलक्ष                               9.8 कोटी
  • ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक सामना जिंकल्यावर    34,314 डॉलर्स        30.19 लाख
  • पाचव्या - सहाव्या क्रमांकाच्या संघाला        700,000 डॉलर्स       6.16 कोटी
  • सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या संघाला  280,000 डॉलर्स      2.46 कोटी
  • ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघाला किमान           250,000 डॉलर्स       2.20 कोटी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com