जाहिरात
Story ProgressBack

पान टपरीवर सिगारेट ओढणाऱ्या तरुणीकडे पाहिलं अन् रंगला खुनी खेळ, नागपुरातील धक्कादायक प्रकार

सिगारेट ओढताना व्हिडिओ केल्याच्या रागातून एका 24 वर्षीय तरुणीने मित्रांच्या मदतीने एकाची निघृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरातून समोर आला आहे.

Read Time: 2 min
पान टपरीवर सिगारेट ओढणाऱ्या तरुणीकडे पाहिलं अन् रंगला खुनी खेळ, नागपुरातील धक्कादायक प्रकार
नागपूर:

सिगारेट ओढताना व्हिडिओ केल्याच्या रागातून एका 24 वर्षीय तरुणीने मित्रांच्या मदतीने एकाची निघृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरातून समोर आला आहे. शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महालक्ष्मीनगर येथे हा प्रकार घडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिलच्या रात्री साडे अकराच्या सुमारास सिद्धेश्वर सभागृहाजवळील पानटपरीजवळ मृत तरुण रणजित राठोड उभा होता. याच वेळी जयश्री आपली मैत्रिण सवितासोबत तेथे आली. त्या दोघीही त्याच ठिकाणी उभ्या राहून सिगारेट ओढत होता. रणजित राठोडने त्या दोघी सिगारेट ओढत असताना त्यांचा व्हिडिओ शूट केला. याशिवाय तो दोघींकडे एकटक पाहत असल्याचा आरोप तरुणींनी केला आहे. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि जयश्री-सविताने रणजितला शिवीगाळ सुरू केली. 

यानंतर तरुणींनी काही दोन मित्रांना तिथं बोलावलं. काही वेळानंतर दोघेही तेथे आले व त्यांनी रणजितला मारहाण सुरू केली. त्यांनी दगडाने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. संधी साधून चौघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच त्यांनी रणजितला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रणजित याचे कपड्याचे दुकान आहे. याशिवाय त्याला चार मुलीही आहेत. एका क्षुल्लक कारणावरुन रणजितच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. 

सीसीटीव्हीमुळे प्रकार उघड
पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी जयश्री दीपक पानझारे (30), सविता यशवंत सायरे (24), आकाश राऊत (26) ही संशयितांची नावं आहेत. पान टपरीजवळ घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी या प्रकरणात दोन तरुणींसह तीन संशयितांना अटक केली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination