जाहिरात

Dhule Crime : सब गडबड है! कोट्यवधींचा उद्योग, मात्र प्रत्यक्षात केवळ पत्र्यांचा शेड; 31 जणांकडून 11 कोटी 68 लाखांचा अपहार

अपहार प्रकरणी 31 जणांविरोधात शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dhule Crime : सब गडबड है! कोट्यवधींचा उद्योग, मात्र प्रत्यक्षात केवळ पत्र्यांचा शेड; 31 जणांकडून 11 कोटी 68 लाखांचा अपहार

नागिंद मोरे, प्रतिनिधी

धुळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील एका टेक्स्टाईल्स हब योजनेंतर्गत नरडाणा एमआयडीसीत मंजूर 12 हजार चौरस मीटर भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे दाखविण्यात आलं.  यामध्ये तब्बल 31 जणांचा समावेश होता. त्यातून पुण्यातील इंडियन बँकेला हाताशी धरून तोच शासकीय भूखंड तारण दाखवून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मंजूर करून घेतले. या प्रकरणी 2021 ते 2023 या कालावधीत बोगस उद्योजक, तत्कालीन एमआयडीसी अधिकारी, विधी अधिकारी, बँक अधिकारी आणि भूखंड माफिया, अशा एकूण 31 जणांनी संगनमतातून तब्बल 11 कोटी 68 लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 31 जणांविरोधात शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शासकीय धोरणानुसार नरडाणा एमआयडीसीत टेक्स्टाईल्स हबसाठी भाडेकरारावर भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागविण्यात आली. त्यानुसार काही कथित उद्योजकांनी एमआयडीसीमधील तत्कालीन अधिकारी, बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट दस्तावेज तयार केले. मात्र शासनाकडून मंजूर असलेल्या या भूखंडावर संबंधितांनी प्रत्यक्षात कोणताही उद्योग सुरू केला नाही. केवळ पत्राच्या शेडमध्ये उद्योग उभारणी व उत्पादनाचा दिखावा केला. नंतर या मंजूर शासकीय भूखंडाच्या मूल्यांकनापेक्षा अधिक पटीने हाच भूखंड तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज लाटले. या गैरव्यवहार प्रकरणी माहिती अधिकारात (फिर्यादी अॅड. मोरे यांनी) माहिती मागविली. नंतर प्राप्त दस्तावेजांच्या आधारे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावर कार्यवाही न झाल्याने शिंदखेडा न्यायालयात दाद मागण्यात आली आणि न्यायालयाच्या आदेशाने तब्बल 31 जणांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Crime: स्वत:च्याच दुकानात दरोड्याचा बनाव...सराफ व्यापाऱ्याने गावकऱ्यांना लुटलं; कोट्यवधी रुपये बुडाले

नक्की वाचा - Pune Crime: स्वत:च्याच दुकानात दरोड्याचा बनाव...सराफ व्यापाऱ्याने गावकऱ्यांना लुटलं; कोट्यवधी रुपये बुडाले


शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्ह्यातील संशयित आरोपींची नावं...

सचिन भिकचंद जैन (शिरपूर), बिग पी. प्रॉपर्टीज प्रा. लि. (धुळे, औरंगाबाद, पुणे), बिग पी. प्रॉपर्टीज प्रा. लि. चे संचालक डॉ. अरुणकुमार रतनलाल आबड, डॉ. प्रीतेश नरेश मुणोत, पुनीत रमेश अग्रवाल, शीतल महावीर जैन, अतिथी पंकज अग्रवाल, नरेश एम. मुणोत, जगदीश अशोक खलाणे, सुनील मुरलीधर लढाणी, के. के. मुंदडा, राजश्री जैन, दीपक सोनवणे, गौरव कश्यप, उमंग अग्रवाल, नितीन भीमराव कड़ावकर, एमआयडीसीचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी जितेंद्र काकुस्ते, अरुया आनंदकर, नम्रता पवार, एस. एम. भोर, आर. एस. बहिरम, एस. बी. पोटे, व्ही. एम. चौधरी, एस. एम. वैजापूरकर, एन. डी. शेवाळे, एमआयडीसीचे विधी सल्लागार अॅड, योगेश महाजन, इंडियन बैंक पुणे शाखा व्यवस्थापक चंदन इश्वर गोस्वामी, जी. जयाशंकर, दीपक दुबे. त्यांच्याविरोधात विविध कलमांन्वये अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com