जाहिरात
This Article is From Jun 12, 2024

चिठ्ठीत लिहिलं 'मनोज जरांगे पाटील पुन्हा...'; मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू

हिंगोलीच्या कळमनुरीतील सिंदगीच्या कपिल मगर या 22 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपला जीव गमावला. 

चिठ्ठीत लिहिलं 'मनोज जरांगे पाटील पुन्हा...'; मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू
हिंगोली:

हिंगोलीतील कळमनुरीतील सिंदगी येथील कपिल मगर या 22 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी स्वत:चा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठा आरक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यात ही 14 वी आत्महत्या आहे. विषारी औषधाच्या दोन ट्यूब खाऊन या तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हिंगोलीच्या कळमनुरीतील सिंदगीच्या कपिल मगर या 22 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपला जीव गमावला. 

विषारी औषधाच्या दोन ट्यूब खाल्ल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान कपिलचा मृत्यू झाला. मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत, लवकरात लवकर आरक्षण द्यावे. सरकार आरक्षण देत नाही म्हणून मी जीव देत आहे अशी चिठ्ठी कपिलने लिहून ठेवली होती. 

बातमी अपडेट होत आहे.