नांदेड शहरात आज ( शुक्रवार ) सकाळी आयकर विभागाने सहा ठिकाणी छापे टाकले. नांदेड शहरातील संजय भंडारी या फायनान्स व्यापाऱ्यासह त्यांच्या भावाचे कार्यालय आणि निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले आहेत. शहरात अचानक झालेल्या या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नांदेड शहरातील शिवाजीनगर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन कार्यालयावर छापा टाकण्यात आला. तसेच कोठारी कॉम्प्लेक्स मधील कार्यालयावरही छापा टाकला गेला. त्याच बरोबर आदिनाथ पतसंस्था, पारसनगर येथील संजय भंडारी आणि त्यांच्या भावाच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले.
हेही वाचा - नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात आज निकाल, 11 वर्षांनंतर तरी न्याय मिळणार?
आयकर विभागाच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड आणि परभणी येथील पथकानी एकाच वेळी ही कारवाई केली. तब्बल 25 गाड्यातून आलेल्या वळपास साठहुन अधिक अधिकारी कर्मचाऱ्यानी संयुक्तपणे ही कारवाई केली. सकाळ पासुन आयकर विभागाची झाडाझडती सुरु आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world