अमजद खान, प्रतिनिधी
बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण ताजं आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातल्या दिवामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका शाळेत थेट वर्गात शिरुन 10 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थींनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आणखी संतापजनक बाब म्हणजे हे कृत्य करणारा नराधम पसार झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र संस्थाचालकांच्या विरोधात कारवाई केली नव्हती. मनसे कार्यकर्त्याने पोलिसांना जाब विचारल्यावर पोलिसांनी संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुख्याध्यापिकेस पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आरोपीच अद्याप फरार आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे
काय आहे प्रकरण?
दिवा शहरात एक इंग्रजी माध्यमाशी शाळा आहे. या शाळेच्या वर्गात मंगळवारी एक दहा वर्षाची अल्पवयीन विद्यार्थींनी वर्गात आली. वर्गात कोणी नव्हते. मुलगी वर्गात येताच तिच्या मागे एक तरुण आला. त्याने इकडे तिकडे पाहून मुलगी एकटी वर्गात आहे. त्यानंतर त्याने अश्लील चाळे सुरु करुन मुलीला हात लावला. मुलीने आरडाआेरडा सुरु केला. त्यानंतर तो तरुण त्याठिकाणाहून पसार झाला.
मुलीसोबत घडलेला प्रकार मुलीच्या मैत्रिणीच्या आईने मुलीच्या आईला सांगितला. मुलीने आईला हा प्रकार ऐकताच धक्का बसला. मुलीसोबत नातेवाईकांनी मुंब्रा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे.
( नक्की वाचा : फेसबुकवर ओळख, घरी बोलावलं आणि बेडरुममध्ये...शाहरुखच्या सहकलाकारावरील आरोपानं बॉलिवूडमध्ये खळबळ )
या घटनेनंतर एका वर्गात शाळेत बाहेरचा व्यक्ती प्रवेश करतो. त्या मुलीसोबत गैरकृत्य करतो. याचा थांग पत्ता शाळेला लागत नाही. पोलिसानी आधी या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकाच्या विरोधात कारवाई केली नव्हती. मनसेचे पदाधिकारी प्रशांत गावडे यांनी कार्यकर्त्यांसोबत पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणाची माहिती घेतली. तेव्हा जी माहिती मिळाली ती धक्कादायक होती. पोलिसांनी शाळेच्या संस्था चालकाच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. गावडे यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल शिंदे यांना या प्रकरणी जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी शाळेच्या संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मनिष तिवारी हीला अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी सापडलेला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world