संपूर्ण देश ढवळून निघालेल्या बदलापूर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. (Akshay Shinde Death) बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदे याला रिमांडमध्ये घेऊन जात असताना तो पोलिसांची पिस्तुल हिसकावून त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर (Akshay Shinde's Encounter) गोळीबार केल्याची लेटेस्ट अपडेट समोर आली आहे.
आतापर्यंत अक्षय शिंदे याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आताच हाती आलेल्या बातमीनुसार त्याचा एन्काऊंटर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - आताची सर्वात मोठी बातमी! 2 चिमुरडींचं शोषण करणारा बदलापुरचा आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू
रिमांडमध्ये नेताना नेमकं काय घडलं?
ठाणे पोलिसांना अक्षय शिंदे याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती. तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला असे म्हटले जात आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या ज्यात त्याचा मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world