जाहिरात

अल्पवयीन मेहुणीला गर्भवती केली, प्रसूतीसाठी पत्नीची कागदपत्र वापरली, पुढे जे झालं ते...

घरात भांडण झाल्यामुळे पती पत्नीला घेवून तिच्या माहेरी राहात होता. त्याच वेळी त्याने हे कृत्य केलं.

अल्पवयीन मेहुणीला गर्भवती केली, प्रसूतीसाठी पत्नीची कागदपत्र वापरली, पुढे जे झालं ते...
अमरावती:

पत्नी असतानाही तिच्या छोट्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला गर्भवती करण्याचा प्रकार उघड झाला आहे. मात्र त्यानंतर जे काही झाले आहे ते पाहून सर्वच जण हादरून गेले आहेत. हा सर्व प्रकार अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात घडला आहे. घरात भांडण झाल्यामुळे पती पत्नीला घेवून तिच्या माहेरी राहात होता. त्याच वेळी त्याने हे कृत्य केलं. पिडीत मेहूणी ही अल्पवयीन आहे. ज्यावेळी हा प्रकार समोर आला त्यावेळी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांच्या पाया खालची वाळू सरकली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भातकुली तालुक्यातील एका गावात हे जोडपं राहात होतं. त्याच्या घरात वाद झाल्यामुळे पती आणि पत्नीने पत्नीच्या घरी राहायला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पत्नीच्या माहेरी हे जोडपं राहायला गेलं. त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा ही होता. त्याच वेळी मेहूणीला त्याने आपल्या जाळ्यात ओढले. मेहूणी ही अल्पवयी होती. तिचं वय केवळ 15 वर्षे 06 महिने होते. मेहूणीही त्यांच्या जाळ्यात ओढळी गेली. त्यांच्या संबध ही प्रस्थापित झाले. त्यातून ती गर्भवती राहीली.

ट्रेंडिंग बातमी -  'राज्यात संशयाचं संभ्रमाचं वातावरण, दिग्गज कसे हरले?' युगेंद्र पवार असं का म्हणाले?

ही बाब दोघांच्याही लक्षात आली. आता पुढे काय करायचे असा प्रश्न या दोघां समोर होता. त्यात मेहूणी ही अल्पवयीन होती. त्यामुळे मोठ्या अडचणी समोर होत्या. अशा वेळी त्यांनी मेहूणीला उपचारासाठी घेवून जात असल्याचे घरात सांगितले. त्यानंतर  बरेच दिवस झाले तरी त्याने मेहूणीला घरी आणलेच नाही. त्याच वेळी त्याने आपल्या पत्नीला तिची कागदपत्र घेवून अकोला इथल्या रूग्णालयात यायला सांगितले.  

ट्रेंडिंग बातमी - भाजपने आधी ठाकरेंना फसवलं आता एकनाथ शिंदेंची फसवणूक, बड्या नेत्याचा बडा आरोप

काही तरी काम असेल त्यामुळे पत्नीही सर्व कागदपत्र घेवून रूग्णालयात पोहोचली. पण तिथे गेल्यावर तिच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिने नवऱ्याला याचा जाब विचारला. पण नवऱ्याने त्यावेळी तिला धमकावले. शिवाय पोटच्या मुलाला जिवे मारणयाची धमकी दिली. शिवाय कागदपत्रांवर तिची सही घेतली. त्यानंतर मेहुणीची प्रसुती अकोले रुग्णालयात झाली. याची माहिती मुलीच्या आईला समजताच तिने तातडीने पोलिस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर जावया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोलापूर पोलिसांनी याची चौकशी आता सुरू केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com